मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : खरी शिवसेना कोणाची? आता निवडणूक आयोग करणार फैसला, दोन्ही गटांना महत्त्वाचे आदेश

BREAKING : खरी शिवसेना कोणाची? आता निवडणूक आयोग करणार फैसला, दोन्ही गटांना महत्त्वाचे आदेश

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ही नेमकी कुणाची आहे? याचा फैसला आता थेट केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे.

  • Published by:  Chetan Patil

प्रशांत लिला रामदार, प्रतिनिधी

नवी दिल्ली, 22 जुलै : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ही नेमकी कुणाची आहे? याचा फैसला आता थेट केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत पराकोटीचे अंतर्गत मतभेद बघायला मिळत आहेत. सध्याच्या घडामोडी पाहता शिवसेनेत उभी फुट पडल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत भाजपसोबत हातमिळवणी केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला आहे. आपण शिवसेनेत असून बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक असल्याचा दावा केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाने विधानसभा-लोकसभेतील गटनेते ते प्रतोद आपलेच असल्याचा दावा केला आहे. या गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाणा निशाण्यावरही दावा केला आहे. दोन्ही बाजूने आपलीच सेना ही खरी शिवसेना आहे, असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची? याबाबतचा फैसला आता निवडणूक आयोगाच्या दारात होणार आहे.

('एकच चूक झाली, पण ती आम्ही कधीच सुधारणार नाही' नाशकात कोणत्या चुकीबद्दल बोलले आदित्य ठाकरे?)

शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागलं आहे. बंडखोर शिवसेनेच्या आमदारांविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान राज्यात नवं सरकार स्थापन होवूनदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

या सर्व राजकीय घडामोड पाहता निवडणूक आयोगाने या प्रकरणाता महत्त्वाचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने 8 ऑगस्टला दुपारी 1 वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणी सुनावणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

First published: