जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Eknath Shinde : पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

Eknath Shinde : पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहे.

पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की ‘अधिवेशनच्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मी भेट घेतली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट झाली. '

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली 23 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी दिल्ली दौऱ्यावर होते. रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी दोघेही दिल्लीला गेले होते. यावेळी राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि खातेवाटपाबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत स्वतः याबद्दल माहिती दिली. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ‘बिझी’, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुन्हा टळला! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की ‘अधिवेशनच्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल’. राज्य सरकारचं अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा शिंदे सरकारचा विचार आहे, त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. पुढे ते म्हणाले, की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मी भेट घेतली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट झाली. या भेटीनंतर शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया दिली. दरम्यान “एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती.” असा दावा सुहास कांदे यांनी केला होता. यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की माझी सुरक्षा नाकारण्यासंदर्भात तत्कालीन गृहराज्यमंत्री उत्तर देऊ शकतात. मी कोणालाही घाबरत नाही. ‘काळजी करू नका सरकार पडणार नाही, निश्चितपणे ‘या’दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार’; उदयनराजेंची माहिती सुप्रीम कोर्टाकडून सरकारवर टांगती तलवार असल्यामुळे मंत्र्यांचे शपथविधी होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे, पण एकनाथ शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार आणि सुप्रीम कोर्ट यांचा काही संबंध नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात