मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काही जण पराभवाचं वर्ष साजरं करायला बीडमध्ये येतात, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

काही जण पराभवाचं वर्ष साजरं करायला बीडमध्ये येतात, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

कोरोनाच्या संकटात घरामध्ये बसले. संकटाच्या काळात मदतीला कुणी आलं नाही

कोरोनाच्या संकटात घरामध्ये बसले. संकटाच्या काळात मदतीला कुणी आलं नाही

कोरोनाच्या संकटात घरामध्ये बसले. संकटाच्या काळात मदतीला कुणी आलं नाही

बीड, 26 ऑक्टोबर: काही जण पराभवाचं वर्ष साजरं करायलाच बीडमध्ये येतात. वर्षभरात या मातीतल्या माणसांची कुणाला आठवण होत नाही. कोरोनाच्या संकटात घरामध्ये बसले. संकटाच्या काळात मदतीला कुणी आलं नाही, असं म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नामोल्लेख न करता पंकजा मुंडे यांना टोला लगावला. तसेच आम्ही सुद्धा 2014 मध्ये पराभूत झालो, पण जनतेला वाऱ्यावर सोडलं नव्हतं, असं धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं. केज येथील येडेश्वरी साखर कारखानाच्या 20-21 च्या गाळप हंगाम उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. हेही वाचा...राज्य सरकारवर पूर्ण विश्वास, पण दगाफटका केल्यास सोडणार नाही- संभाजी राजे पुढे बोलताना ते म्हणाले की, ऊसतोड मजूर आंदोलन हे भाव वाढी पुरतं आहे. ऊसतोड मजूर महामंडळातून मोठी मदत करणार आहे, उसतोड मजूर दुसऱ्याच्या रानात जाणार नाही. यासाठी मोठी मदत करणार आहे. ऊसतोड मजूर ऊस उत्पादक शेतकरी झाला पाहिजे. यासाठी प्रयत्न करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. बजरंग सोनवणे यांनी सात वर्षात कारखाना फेडला. सात वर्षांत आमच्या वैद्यनाथ कारखान्यात अडीचशे कोटी कर्ज काढलं, असं म्हणत तरी सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस पडू नये, म्हणून आम्ही राजकरण न करता थक हमीची जबाबदारी घेतली असल्याचं धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं. मांजरा धारण 70 टक्के, उस्मानाबाद धारण 30 टक्के भरले आहे. तीन जिल्ह्यासाठी सर्वाधिक फायदा बीडला झाला पाहिजे. थेंब ना थेंब जास्त मिळवून देणार, असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी यावेळी दिलं. ऊसतोड मजुरांना राज्य सरकार योग्य दर वाढ करेल, जाणीवपूर्वक ऊसतोड मजूर महामंडळ माझ्या विभागाकडे घेतलं असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. विशेष साह्य करून ऊसतोड मजुरांचे कायमचे प्रश्न सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं धनंजय मुंडे म्हणाले. मागच्या पाच वर्षात महामंडळची साधी नोंद नव्हती, रजिस्टर नव्हतं मोकळं होतं, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सणसणीत टीका केली. पंकजा मुंडेंसह भाजप नेत्यांवर गुन्हा.. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ऑनलाईन दसरा मेळावा घेणं महागात पडण्याची शक्यता आहे. अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा यांच्यासह उभय नेत्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भादंवि 188, 269, 270 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पंकजा मुंडे, खासदार भागवत कराड, महादेव जानकर, आमदार मोनिका राजुरे, आमदार मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आणि इतर 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सावरगाव येथील भगवान गडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडे दरवर्षी दसरा मेळावा घेत असतात. पण, यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा घेत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंकजा मुंडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडीओ अपलोड करून सर्व समर्थक आणि भगवान भक्तांना महत्त्वाची सूचना केली होती. हेही वाचा..उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप या सामन्यात राष्ट्रवादीनेही घेतली उडी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना वंदन करून पंकजा मुंडे यांनी दसऱ्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देतानाच येत्या काळात केवळ भगवानगडच नाही तर मुंबईतील शिवाजी पार्क भरून दाखवायचं आहे. तिथे शक्तिप्रदर्शन करायचं आहे, अशी घोषणा पंकजा यांनी केली. मी घर बदलणार नाही, जिथे आहे तिथेच राहणार आहे. आता मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री झाली आहे. पक्षाचे काम देशाच्या पातळीवर करणार आहे, असं सांगत पंकजा यांनी पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
First published:

Tags: Beed, Dhananjay munde, Pankaja munde, Parli

पुढील बातम्या