उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप या सामन्यात राष्ट्रवादीनेही घेतली उडी, केला जोरदार पलटवार

उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप या सामन्यात राष्ट्रवादीनेही घेतली उडी, केला जोरदार पलटवार

उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप या सामन्यात आता राष्ट्रवादीनेही उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली. तसंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही टोला लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला उत्तर देत भाजपनेही चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप या सामन्यात आता राष्ट्रवादीनेही उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

'शिवसेना आणि भाजप या दोघांच्या वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्य परिस्थितीचा भाजपाला आरसा दाखवला आहे. वेगवेगळे भाष्य करुन भाजप जनतेची दिशाभूल करण्याचे काम कसे करतेय हे दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवाय राज्यपाल व त्यांचे नेते लोकांची दिशाभूल कशी करत आहेत हे उघडपणे लोकांसमोर मांडले आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे.

'महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांची विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. त्यावर जोरदार प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिलं आहे.

'धर्माच्या आधारावर राजकारण करणे हा आमचा कार्यक्रम नाही. भाजप धर्माच्या आधारावर राजकारण करुन मतांचे राजकारण करते हे लोकांना माहीत आहे,' असा घणाघातही नवाब मलिक यांनी केला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 26, 2020, 6:49 PM IST

ताज्या बातम्या