मुंबई, 17 डिसेंबर : भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या एका कंत्राटात फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड आणी इतर आरोपींविरोधात 2014 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या गुन्हाचा तपास बंद करण्यात यावा अशी मागणी करणारा सी समरी अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने अतिरिक्त महानगरदंडाधिकारी न्यायालयात सादर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा मिळालेले लाड हे किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतर तिसरे भाजप नेते आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? 2009 मध्ये महापालिकेच्या घाटकोपर विभागाने जलवाहिनी देखभाल, संरक्षणासाठी दोन वर्षांचे कंत्राट देण्यासाठी निविदा जारी केल्या होत्या त्यावेळी बीव्हीजी लिमिटेड आणी प्रसाद लाड यांची क्रिस्टल ट्रेडकॉम या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन त्यासाठी निविदा भरल्या. या दोन्ही कंपन्यांनी भागिदारी करार करत बीव्हीजी क्रिस्टल जाईंट व्हेंचर ही कंपनी स्थापन केली. तसेच प्रत्यक्ष काम करण्यासाठी अग्रवाल यांची निवड करण्यात आली. कामाच्या एकूण रकमेच्या पाच टक्के रॉयल्टी बीव्हीजी व क्रीस्टल या दोन कंपन्यांना मिळेल, असे या करारामध्ये नमूद करण्यात आले होते. या कंपनीची निविदा पालिकेने मंजूर केली. तसेच कामाच्या खर्चाचे दीडशे कोटींचे कंत्राटही मंजूर केले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मोबदलाच मिळाला नसल्याची तक्रार अग्रवाल यांनी दाखल केली होती. 2014 मध्ये दाखल झाला होता गुन्हा या प्रकरणी प्रसाद लाड आणी इतर आरोपींविरोधात 2014 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात आता प्रसाद लाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या गुन्हाचा तपास बंद करण्यात यावा अशी मागणी करणारा सी समरी अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने अतिरिक्त महानगरदंडाधिकारी न्यायालयात सादर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा मिळालेले लाड हे किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतर तिसरे भाजप नेते आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.