मुंबई, 8 डिसेंबर : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार शिंदे, फडणवीस सरकारच्या काळात उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आरोपांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समचार घेतला आहे. मी मागेही सांगितलं उद्धवजींकडे एक अस्त्र आहे, टोमणे अस्त्र असं त्याचं नाव आहे. मला एकाच गोष्टींचा आनंद आहे की त्यांना उद्योगांचे महत्त्व कळाले, कारण राज्यातील उद्योग त्यांच्यामुळेच बाहेर गेल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूक निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हटलं फडणवीस यांनी?
शिंदे, फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातील काही मोठे प्रकल्प हे महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. यावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. शिंदे, फडणवीस सरकारमुळेच राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. तर राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. आता या वादात देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यांनी यावरून उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. उद्धवजींकडे एक अस्त्र आहे, टोमणे अस्त्र असं त्याचं नाव आहे. मला एकाच गोष्टींचा आनंद आहे की त्यांना उद्योगांचे महत्त्व कळाले, कारण राज्यातील उद्योग त्यांच्यामुळेच बाहेर गेल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : मी प्रचाराला गेलो होतो तेव्हाच...; फडणवीसांनी सांगितलं गुजरात निवडणुकीच्या विजयाचं रहस्य
गुजरात निकालावर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात निवडणूक निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी जेव्हा गुजरातमध्ये सभांना गेलो होतो, तेव्हाच सर्व चित्र स्पष्ट दिसत होतं. फक्त मोदीच विकास करू शकतात असा विश्वास लोकांमध्ये होता. मोदींचं नाव घेताच लोकांमध्ये उत्साह दिसून यायचा. भाजप राज्यात गेली 27 वर्ष सत्तेत आहे, पुन्हा एकदा तेथील जनतेने भाजपवरच विश्वास दाखवला. सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे मी अभिनंदन करतो असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shiv sena, Uddhav Thackeray