मुंबई 05 ऑगस्ट : शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले आहेत. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली गेली. यात नारायण राणेंचाही सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावरही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलतायत हे सांगितलं होतं, असा खुलासा केसरकरांनी केला. आनंद दिघेंच्या पुतण्याच्या अडचणीत भर, मुंबई पोलिसांनी बजावलं समन्स पुढे ते म्हणाले पंतप्रधान मोदींनी प्रतिसादही दिला. त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात संवाद सुरू झाला. नंतर त्यांची भेटही झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते. परंतु नंतर 12 आमदारांचं निलंबन झालं. यानंतर राणेंना केंद्रात घेतलं गेलं. यामुळं उद्धव ठाकरे नाराज झाले. ही गोष्ट दोन-तीन लोकांना माहिती होती. त्यात रश्मी ठाकरेही होत्या, असा खुलासा केसरकरांनी केला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या चिन्हासाठी शिंदे आणि उद्धव ठाकरे गट न्यायालयीन लढाई लढत आहेत. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आता सोमवारी सुनावणी होणार आहे. यावरही केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षांतर्गत लोकशाही असावी की नाही हेही या निकालावरून समजेल, असं केसरकर म्हणाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाची बाजी; ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये विजयाचा धडाका राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून आणि शिंदे-फडणवीसांना शपथ घेऊन आता महिना उलटून गेला. मात्र तरीही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरुन अनेक नेते शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. यावरही केसरकरांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विस्ताराला वेळ झाला तरी चालेल,पण सुप्रीम कोर्टाचा आदर राखणं गरजेचे आहे आणि तो आमच्याकडून राखला जात आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. सोमवारी अंतरीम आदेश येईल आणि त्यानंतर विस्तार होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याआधी राहुल शेवाळेंनीही याबाबत खुलासा केला होता. मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घ्यायला आले होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजित पवार (Ajit Pawar) आणि अशोक चव्हाणही (Ashok Chavan) होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांची वेगळी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झालं, याचा बॉम्ब राहुल शेवाळे यांनी यापूर्वी फोडला होता. ‘जून महिन्यात उद्धव ठाकरेंनी मोदींची भेट घेतली तेव्हा पुन्हा युती करण्याबाबत चर्चा झाली. पण जुलै महिन्यात राज्यातल्या भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली, त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले,’ असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं होतं. यानंतर आपण उद्धव ठाकरेंना भाजपसोबत पुन्हा युती करायला हवी, असं सांगितलं. तेव्हा माझे प्रयत्न करून झाले, आता तुम्ही प्रयत्न करा, असं उद्धव ठाकरेंनी आपल्याला सांगितल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.