Home /News /maharashtra /

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाची बाजी; ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये विजयाचा धडाका

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाची बाजी; ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये विजयाचा धडाका

या विजयानंतर संजय सिरसाट यांच्या पत्नी भावनिक झाल्या होत्या. निकाल ऐकून त्यांना रडू कोसळले. निष्ठावान आमदार संजय सिरसाट यांना लोकांनी पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले.

  औरंगाबाद, 05 ऑगस्ट : शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये शिंदे गटाने ग्रामपंचायती निवडणुकीत धडक मारली आहे. शिंदे गटाला निवडणुकीत जनाधार मिळणार नाही, अशी टीका केली जात होती. मात्र, ग्रामपंचायत स्तरावरही शिंदे गट शिवसेनेला भारी ठरत आहे. त्यामुळे शिवसेनेची आणखी गोची होण्याची शक्यता आहे. आमदार संजय सिरसाट यांनी 17 पैकी 5 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. संदीपान भुमरे यांनीही 7 पैकी 6 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. सिल्लोडमध्येही अब्दुल सत्तार यांनी 3 पैकी 2 ग्रामपंचायत ताब्यात घेऊन शिंदे गटाचा वरचष्मा दाखवून दिला आहे. या विजयानंतर संजय सिरसाट यांच्या पत्नी भावनिक झाल्या होत्या. निकाल ऐकून त्यांना रडू कोसळले. निष्ठावान आमदार संजय सिरसाट यांना लोकांनी पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत, असे संजय सिरसाट यांच्या मुलीने सांगितले. औरंगाबाद जिल्हयात सर्वात मोठी ग्रामपंचायत संजय शिरसाट यांच्या मतदार संघात होती. वडगाव कोल्हाटी या ग्राम पंचायतीमध्ये संजय शिरसाट यांच्या गटाने 17 पैकी 11 जागा आपल्या ताब्यात घेतल्या आणि ग्रामपंचायत सेनेकडून खेचली. शिवसेनेला केवळ चार जागा राखता आल्या. मतमोजणी केंद्रावर आलेल्या संजय सिरसाट यांच्या पत्नी यावेळी भावनिक झाल्या. शिवसेनेनं सिरसाट यांना गद्दार म्हटले पण लोक आमच्यासोबत आहेत हे बघून भावना आवरता आल्या नाहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांची मुलगी म्हणाली, हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे.
  औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदार संघावरएकहाती अब्दुल सत्तार यांची पकड आहे. त्यांच्याच पॅनलने तिन्ही ग्रामपंचायतीवर एकसाथ कब्जा केला आहे. सिल्लोड तालुक्यातील तीन ग्रामपंचायती उपळी, जंजाळा व नानेगाव तीनही ग्राम पंचायतवर आमदार अब्दुल सत्तार यांचे एकहाती वर्चस्व कायम राहिले सेनेला हाती काहीच लागले नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Aurangabad News, Eknath Shinde, Shivsena

  पुढील बातम्या