Home /News /maharashtra /

आनंद दिघेंच्या पुतण्याच्या अडचणीत भर, मुंबई पोलिसांनी बजावलं समन्स

आनंद दिघेंच्या पुतण्याच्या अडचणीत भर, मुंबई पोलिसांनी बजावलं समन्स

शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांच्या अडचणीत भर पडली आहे. दिघे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलं आहे.

    मुंबई, 5 ऑगस्ट : शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांच्या अडचणीत भर पडली आहे. दिघे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलं आहे. बलात्कार प्रकरणातील पीडित व्यक्तीला धमकावण्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपामध्ये केदार यांची चौकशी होणार आहे. केदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. दिवंगत शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या कामामुळे ठाण्यात शिवसेनेचा पाया भक्कम झाला. पण आता परिस्थिती वेगळी आहे. ठाण्यातील सर्व नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत आनंद दिघे यांच्यासोबत रक्ताचं नातं असलेले केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात राम शिंदेंची सरशी, सत्तांतर होताच ढासळला बुरूज विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांना नुकतीच ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती.  त्यानंतर दिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Mumbai police, Shivsena

    पुढील बातम्या