मुंबई, 10 सप्टेंबर : गणेशोत्सवानंतर (Ganeshostav) राज्यातील कोरोनाची परिस्थिती भयंकर होईल अशी भीती व्यक्त केली जाते आहे. पण गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बाप्पा पावला आहे (Maharashtra corona cases). विघ्नहर्त्याचं आगमन होताच राज्यावर मोठी कृपा झाली आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganesh chaturthi) दिवशी राज्यातील कोरोनाची प्रकरणं कमी झाली आहेत (Maharashtra corona update).
राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाची आकडेवारी जारी केली आहे. राज्यातील कोरोनाचा आकडा खूपच दिलासादायक आहे. राज्यात आज नव्या कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्याही घटली आहे. तर बऱ्या होणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे 8 जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही आहे.
राज्याची आजची कोरोनाची परिस्थिती
उपचार घेत असलेले रुग्ण - 49,812
आज आढळलेले नवे रुग्ण - 4154
मृत्यू झालेले रुग्ण - 44
बरे झालेले रुग्ण - 4524
हे वाचा - आता काखेतून कोरोनाचं निदान; घाम सांगणार तुम्हाला संसर्ग आहे की नाही
राज्यात काल (9 सप्टेंबर) उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा 50 हजार पार गेला होता तर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही कमी झाली होती. पण आज बाप्पाच्या आगमन होताच. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला आहे आणि उपचार घेत असलेले रुग्णही पुन्हा 50 हजारच्या खाली आले आहेत.
8 जिल्ह्यात आज एकही कोरोना रुग्ण नाही
जिल्हा | कोरोना रुग्ण | |
1 | धुळे | 00 |
2 | हिंगोली | 00 |
3 | परभणी | 00 |
4 | अकोला | 00 |
5 | यवतमाळ | 00 |
6 | वाशिम | 00 |
7 | भंडारा | 00 |
8 | गोंदिया | 00 |
हे वाचा - लाल मुंग्यांच्या चटणीने कोरोनावर उपचार? सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय
जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो, मुख्यमंत्री ठाकरेंची गणराया चरणी प्रार्थना
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीही श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणरायाच्या चरणी केली आहे.गणरायाला विघ्नहर्ता असं म्हणतात. तो हे संकट कायमचं दूर करेल अशी मला खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हे वाचा - Ganesh Chaturthi: राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पा विराजमान, पहा फोटो आणि VIDEO
उद्धव ठाकरे म्हणाले, आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतो. एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असं चित्र असायचं. मात्र दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असलं तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे.
तसंच कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Ganesh chaturthi, Maharashtra