Home /News /national /

Covid Vaccine Tracker: कोरोना व्हॅक्सिनच्या पहिल्या डोसमुळे 96.6 टक्के तर दुसऱ्या डोसमुळे 97.5% मृत्यूचा धोका कमी: केंद्र

Covid Vaccine Tracker: कोरोना व्हॅक्सिनच्या पहिल्या डोसमुळे 96.6 टक्के तर दुसऱ्या डोसमुळे 97.5% मृत्यूचा धोका कमी: केंद्र

Corona Vaccination: केंद्र सरकारकडून दिवसेंदिवस लसीकरणाचा वेग वाढताना दिसत आहे. त्यातच आता केंद्र कोविड व्हॅक्सिन ट्रॅकर (Covid Vaccine Tracker)लॉन्च करणार आहे.

    नवी दिल्ली, 10 सप्टेंबर: देशात कोरोना व्हायरससारख्या (Corona Virus) महामारीचं संकट आहे. अशातच कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) देशात मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून दिवसेंदिवस लसीकरणाचा वेग वाढताना दिसत आहे. त्यातच आता केंद्र कोविड व्हॅक्सिन ट्रॅकर (Covid Vaccine Tracker)लॉन्च करणार आहे. या ट्रॅकरमध्ये लोक व्हॅक्सिनच्या परिणामाबद्दल साप्ताहिक अपडेट मिळवू शकतील. त्यासोबतच व्हॅक्सिन घेतली किंवा न घेतल्यानं कोरोनामुळे मृत्यूचा धोका किती आहे हे देखील लोकांना कळू शकणार आहे. 18 एप्रिल ते 16 ऑगस्ट पर्यंतचा डेटा दर्शवितो की व्हॅक्सिनच्या पहिल्या डोसमुळे मृत्यूचा धोका 96.6 टक्के आणि दुसऱ्या डोससह 97.5 टक्के कमी झाला आहे, अशी माहिती इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिली आहे. मुंबईची शान 'लालबागचा राजा' ऑनलाईन दर्शन, प्रसादासाठी करा बुकींग लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं, मे महिन्यात दररोज सुमारे 20 लाख लसी दिल्या जात होत्या. आता सप्टेंबर महिन्यात ही संख्या वाढून 78 लाख झाली आहे. आता ही संख्या आणखीन वाढेल. मे महिन्यात 6 कोटी लसी देण्यात आल्या. तर सप्टेंबरच्या पहिल्या 7 दिवसात त्यापेक्षा जास्त डोस देण्यात आले. गेल्या 24 तास 86 लाख लस देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मंत्रालयानं असंही म्हटलं आहे की, देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही सुरू आहे. केरळ राज्याची चिंता केरळ हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे कोरोनाचे 1 लाखांहून अधिक सक्रिय प्रकरण आहेत, असं आरोग्य सचिवांनी म्हटलं आहे. देशातील एकूण कोरोना प्रकरणांमध्ये केरळ 61 टक्के आहे. केरळ राज्यात सध्या एकूण 3 लाख 93 हजार सक्रिय प्रकरणे आहेत. केरळमध्ये 2 लाख 40 हजारांहून अधिक प्रकरणे आहेत तर महाराष्ट्रात 51 हजार 400 सक्रिय प्रकरणे आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus cases

    पुढील बातम्या