मुंबई, 10 सप्टेंबर : आज श्री गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi)... गणरायाचं आगमन झाल्याने सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांच्या घरी लाडक्या बाप्पा विराजमान (Politician welcomes Ganpati Bappa at home) झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज वर्षा येथे मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया!! pic.twitter.com/MNfUnCdnuw
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 10, 2021
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही नागपुरातील घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. नितीन गडकरी यांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
'पवारांनी केलेलं करेक्ट वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय' देवेंद्र फडणवीसांनी साधला करेक्ट निशाणा
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानीही गणरायाचे आगमन झाले. राजेश टोपेंनी ट्विट करत म्हटलं, सहकुटुंब सहपरिवारासह गणपती बाप्पाची स्थापना केली. श्री गणेशाची आराधना करताना राज्यातील कोरोनाचे संकट दूर करून जनतेला सुखात ठेवण्याची श्री चरणी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया..!!!
सहकुटुंब सहपरिवारासह गणपती बाप्पाची स्थापना केली. श्री गणेशाची आराधना करताना राज्यातील कोरोनाचे संकट दूर करून जनतेला सुखात ठेवण्याची श्री चरणी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया..!!! pic.twitter.com/nZVWuWpTYe
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 10, 2021
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेशाची अतिशय श्रद्धापूर्वक आणि भक्तीपूर्वक प्रतिष्ठापना झाली. यंदाचा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा लागत आहे, त्याचे कारण म्हणजे कोरोनाचे संकट संबंध महाराष्ट्र आणि देशावर आहे. म्हणून माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की, आपण गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा. कोरोनाची भीती अजूनही आपल्या सर्वांसमोर आहे. आपण परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करूया की, हे गणराया कोरोनाचे निर्दालन होऊन आमच्या सर्वांचे जीवनामध्ये आनंद निर्माण होण्यासाठी आपले आशीर्वाद लाभूदे! अशी प्रार्थना वळसे पाटलांनी गणरायाकडे केली आहे.
'सर्वात मोठा आनंद' म्हणत, रवी जाधवने स्वतः साकारली बाप्पाची सुंदर मूर्ती
म्हणून माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की, आपण गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा. कोरोनाची भीती अजूनही आपल्या सर्वांसमोर आहे. आपण परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करूया की, हे गणराया कोरोनाचे निर्दालन होऊन आमच्या सर्वांचे जीवनामध्ये आनंद निर्माण होण्यासाठी आपले आशीर्वाद लाभूदे! pic.twitter.com/Yovj9rFeS0
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) September 10, 2021
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याही घरी गणरायाचं आगमन झालं आहे.
घरचा बाप्पा!!! pic.twitter.com/vvTNDObhy0
— nitesh rane (@NiteshNRane) September 10, 2021
तैमुरसह करीनाने केली बाप्पाची पूजा; छोट्या नवाबने हाताने साकारला बाप्पा
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आज सालाबादप्रमाणे गणरायाचे उत्साहात आगमन झाले. अशोक चव्हाण दोन दिवसांपासून अतिवृष्टीग्रस्त नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे घरी गणरायाचे आगमन होत असताना ते उपस्तित नव्हते. त्यांच्या कुटुंबियांनी गणपती बाप्पाची विधीवत प्रतिष्ठापना केली. अशोक चव्हाण यांनी नांदेड नजिकच्या भाऊराव सहकारी साखर कारखान्यात गणरायाचे पूजन केले.
सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईतील आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. #गणेशोत्सव #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya pic.twitter.com/zI4mwBBFfs
— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 10, 2021
मुख्यमंत्र्यांची गणराया चरणी प्रार्थना
मुख्यमंत्री म्हणतात की, आजपासून श्री गणरायाचं आगमन होत असून, जे जे काही अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी आजच्या दिवशी गणरायाच्या चरणी करतो. आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय.एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असं चित्र असायचं. मात्र दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असलं तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ganesh chaturthi