नवी दिल्ली, 09 सप्टेंबर : कोरोनावर उपचारासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो आहे. अशात एका पारंपारिक उपचारालाही कोरोनावार परवानगी द्यावी, अशी मागणी होऊ लागली. हा पारंपारिक उपचार म्हणजे लाल मुंग्यांची चटणी (Red ant chutney for corona treatment). कोरोनावर उपचारासाठी लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने (Supreme court) फेटाळाली आहे.
संपूर्ण देशभरात कोरोनासाठी अशा पारंपारिक उपचाराला (Red Ant Sauce) परवानगी नाही देऊ शकत, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. कोर्टाने म्हटलं, कित्येक पारंपारिक उपचार आहे. आपल्या घरातही अनेक पारंपारिक उपचार केले जातात. पण या उपचारांचा परिणाम स्वतःला भोगावा लागतो. संपूर्ण देशासाठी आम्ही अशा पारंपारिक उपचाराचा अवलंब कऱण्यास नाही सांगू शकत.
हे वाचा - गणेशोत्सवाआधी धोक्याची घंटा! अॅक्टिव्ह केस 50000 पार; बरे होणारे रुग्णही कमी
ओडिशातील आदिवासी समाजाचे सदस्य नायधर पाढीयाल यांनी ही याचिका दाखल केली होती. सुरुवातीला ओडिशा हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर कोविड -19 विषाणूवर (Covid -19 ) केला जाऊ शकतो, असा दावा काही जण करत आहेत. हा दावा कितपत खरा आहे हे तपासण्यासाठी आयुष मंत्रालयाने संशोधन करावं, असा आदेश हायकोर्टाने दिला होता. त्यानंतर हायकोर्टाने याचिका फेटाळाली.
हे वाचा - Corona Vaccine : कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नाही, काळजी करू नका कारण...
ओडिशा हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. पण आता सुप्रीम कोर्टानेसुद्धा याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्याला कोर्टाने कोरोना लस घेण्याचे निर्देश दिले आहेत.
काय असतं या मुंग्यांच्या चटणीत?
पाढीयाल यांच्या मते, चटणीमध्ये फॉर्मिक अॅसिड, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, जिंक आणि लोह असते. ही मुलद्रव्ये आपली रोगप्रतिकारक शक्तीत सुधारणा करतात. त्यांनी पुढं सांगितलं की, 'ओडीसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांतील अनेक ठिकाणी लाल मुंग्यांचे सेवन केले जाते. तसेच याचा बर्याच रोगांवर उपचार म्हणून वापर केला जातो. करतात.' पाढीयाल यांच्या मते, आदिवासी भागात कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी असण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Supreme court