बँकॉक, 10 सप्टेंबर : सध्या कोरोनाच्या (Coronavirus) निदानासाठी (Corona test) प्रामुख्याने आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR test) केली जाते. ज्यामध्ये नाक (Nose swab) किंवा घशातील स्वॅब (Throat swab) नमुने घेतले जातात. पण आता नाक आणि तोंड नाही तर चक्क काखेतून कोरोनाचं (Armpit Sweat) निदान होणार आहे. काखेतील घाम तुम्ही कोरोना (Detect corona in Armpit sweat) संक्रमित आहात की नाही हे सांगणार आहे (Device to Detect Coronavirus).
थायलँडच्या (Thaliland) शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसच्या निदानासाठी एक असं मशीन तयार केलं आहे , जे काखेतील घामातूनच कोरोनाचं निदान करू शकतं. शास्त्रज्ञांच्या मते, काखेतील घामात कोरोनाव्हायरस असू शकतो. त्याचं निदान करण्यासाठी संशोधकांनी मोबाईल व्हायरस डिटेक्टर (Sweat-Based Mobile Virus Detector) तयार केलं आहे.
बँकॉकच्या (Bangkok) चुलालॉन्गकोर्न युनिव्हर्सिटीचे (Chulalongkorn University) चॅडिंग कुल्सिंग (Chadin Kulsing) यांनी सांगितलं, आम्ही दुकानदारांचे सॅम्पल घेतले होते. त्यातून आम्हाला समजलं की ज्यांना कोरोना आहे, त्यांच्या घामातून वेगळ्या प्रकारचं केमिकल निघतं. त्यानंतर आम्ही एक उपकरण तयार केलं जे फक्त कोरोना रुग्णांच्या घामातील ते खास केमिकल ओळखू शकते.
हे वाचा - लाल मुंग्यांच्या चटणीने कोरोनावर उपचार? सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय
बँकॉकमधील दुकानदारांवर हे उपकरण टेस्ट करण्यात आलं. हे उपकरण 95 टक्के यशस्वी निकाल देतं. नाकाच्या स्वॅब टेस्टच्या तुलनेत ही पद्धत जास्त चांगली असल्याचं दिसून आलं आहे. कोरोना निदानाच्या स्वॅब टेस्टेपेक्षा हा सोपा पर्याय असू शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
यामध्ये फक्त एक कॉटन स्वॅब आपल्या काखेत 15 मिनिटं ठेवायचा आहे. त्यानंतर एका ग्लाय वायलमध्ये हे स्वॅब ठेऊन यूव्ही किरणांमध्ये स्टर्लाइझ केलं जातं. नंतर सक्शन होजच्या मदतीने सॅम्पल बाहेर काढलं जातं आणि त्यावर प्रेशर टाकून रिझल्टसाठी त्याची तपासणी होते. या संपूर्ण प्रक्रियेला फक्त 30 सेकंद लागतात.
सध्या हे उपकरण विकसित टप्प्यात आहे. याबाबतच अभ्यासही अजून प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यानंतर या उपकरणाी प्रमाणिकता तपासली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Thailand