जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चिंता वाढली : भिवंडीतील त्या वृद्धाश्रमात आणखी 17 जण Covid पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या 79 वर

चिंता वाढली : भिवंडीतील त्या वृद्धाश्रमात आणखी 17 जण Covid पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या 79 वर

चिंता वाढली : भिवंडीतील त्या वृद्धाश्रमात आणखी 17 जण Covid पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या 79 वर

Coronavirus cases in Bhiwandi Maharashtra: भिवंडीत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पहायला मिळत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भिवंडी, 1 डिसेंबर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron variant of Coronavirus) चिंता वाढलेली असतानाच आता भिवंडीतून (Bhiwandi) धक्कादायक माहिती समोर आली आहे. भिवंडीतील मातोश्री वृद्धाश्रमात (Matoshri old age home) आणखी 17 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याच वृद्धाश्रमात काही दिवसांपूर्वी 62 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता आणखी 17 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली आहे. (17 more tests covid19 positive in Matoshri old age home in Bhiwandi) भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात मातोश्री वृद्धाश्रम आहे. या वद्धाश्रमात काहींना ताप येत होता. तसेच कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येत होती. त्यानंतर या सर्वांची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या 17 जणांमध्ये चार ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर एक महिला आणि तर 12 जण हे केअरटेकर आहेत. यापूर्वी मातोश्री वृद्धाश्रमातील तब्बल 62 वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खडवली येथील नदीकिनारी मातोश्री वृद्धाश्रम असून त्या ठिकाणी सुमारे 100 हून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध वास्तव्यास आहेत. कोरोनाची लागण झालेल्या सर्वांना उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा :  Omicron व्हेरिएंटवर प्रभावी आहे Covishield लस? पूनावाला यांनी दिलं उत्तर दक्षिण आफ्रिकेवरून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट (Omicron variant of Coronavirus) आढळून आला आहे. राज्यात दक्षिण आफ्रिकेवरून आलेल्या प्रवाशांची माहिती गोळा केली जात आहे, पण आतापर्यंत आलेल्या प्रवाशांपैकी 6 जण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहे. मुंबई एक तर पुण्यात 2 जणांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेवरून आलेल्या प्रवाशांपैकी 6 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामध्ये मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर महापालिका आणि पुण्यात एक-एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 2 नायजेरियन पॉझिटिव्ह आढळून आले आहे, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. वाचा :  ओमायक्रॉनचा धोका असतानाच Gavi च्या प्रमुखांनी व्यक्त केली ‘ही’ चिंता राज्यात १ हजार प्रवाशी दक्षिण आफ्रिकेवरून आले डोंबिवलीतील एक तरुण दक्षिण आफ्रिकेवरून आला असून कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. पण, हा तरुण दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एकमेव प्रवासी नसून 10 नोव्हेंबरपासून 1000 प्रवाशी मुंबईत आल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackery) यांनी दिली. ‘राज्यात पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाही. पण काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी आले आहे. या सर्व प्रवाशांना ट्रेस केले जात आहे. ते मुंबईत आहेत त्यांची माहिती घेतली जात आहे’, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात