#bhiwandi

Showing of 1 - 14 from 41 results
VIDEO : पाण्याची टाकी पाडणे बेतले जीवावर,'पोकलेन'वर कोसळली टाकी

व्हिडिओAug 20, 2018

VIDEO : पाण्याची टाकी पाडणे बेतले जीवावर,'पोकलेन'वर कोसळली टाकी

20 आॅगस्ट : भिवंडीरोड रेल्वे स्टेशन लगत असलेली पाण्याची उंच टाकी निष्कासित करीत असताना पोकलेन मशीनवर कोसळल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. विजय पवार (४०) असं जखमी पोकलेन चालकाचे नाव आहे. रेल्वे प्रशासनाने मालगाडीच्या कॉरिडॉर निर्मितीसाठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्या मार्गात रेल्वे स्टेशनवरील पाण्याची टाकी अडथळा येत होती. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने ९० हजार लिटर क्षमतेची सुस्थितीत असलेली १०० मीटर उंचीची पाण्याची टाकी निष्कासन करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र पोकलेन मशीनने टाकी निष्कासन करताना खबरदारी न घेतल्याने टाकीचा मलबा पोकलेनवर कोसळून चालक विजय पवार हा त्या मलब्यात सापडून गंभीर जखमी झाला आहे.चालक विजय पवार याला बेशुद्ध अवस्थेतच ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या रेल्वे अधिकारी अथवा ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे पालिका गटनेते निलेश चौधरी यांनी केली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close