जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Omicron Update : राज्यासाठी चिंतेची बातमी, दक्षिण आफ्रिकेवरून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह!

Omicron Update : राज्यासाठी चिंतेची बातमी, दक्षिण आफ्रिकेवरून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह!

पिंपरी चिंचवडमध्ये 2 नायजेरियन पॉझिटिव्ह आढळून आले आहे, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट (Omicron variant of Coronavirus) आढळून आला आहे. राज्यात दक्षिण आफ्रिकेवरून आलेल्या प्रवाशांची माहिती गोळा केली जात आहे, पण आतापर्यंत आलेल्या प्रवाशांपैकी 6 जण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहे. मुंबई एक तर पुण्यात 2 जणांचा समावेश आहे. एनआयए वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेवरून आलेल्या प्रवाशांपैकी ६ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामध्ये मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर महापालिका आणि पुण्यात एक-एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 2 नायजेरियन पॉझिटिव्ह आढळून आले आहे, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. लग्नात सप्तपदीआधी नवरीबाईची भलतीच डिमांड; Wedding video पाहून डोक्याला लावाल हात कोरोनाचा नवीन घातक व्हेरिएंट आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली आहे. १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर ढकलला आहे. पण, तरीही दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. राज्यात १ हजार प्रवाशी दक्षिण आफ्रिकेवरून आले! दरम्यान, डोंबिवलीतील (dombivali) एक तरुण दक्षिण आफ्रिकेवरून आला असून कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. पण, हा तरुण दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एकमेव प्रवासी नसून 10 नोव्हेंबरपासून 1000 प्रवाशी मुंबईत आल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांनी दिली. तुम्हालाही झोपेत बडबडण्याची सवय आहे का? जीवनशैलीत असा बदल ठरेल गुणकारी ‘राज्यात पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाही. पण काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी आले आहे. या सर्व प्रवाशांना ट्रेस केले जात आहे. ते मुंबईत आहेत त्यांची माहिती घेतली जात आहे’, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात