मराठी बातम्या /बातम्या /देश /सर्वजण लसवंत होईपर्यंत कोणीही सुरक्षित नाही, Gavi च्या प्रमुखांनी गरीब देशांमधील लसीकरणाबाबत व्यक्त केली चिंता

सर्वजण लसवंत होईपर्यंत कोणीही सुरक्षित नाही, Gavi च्या प्रमुखांनी गरीब देशांमधील लसीकरणाबाबत व्यक्त केली चिंता

निम्म्याहून अधिक देशांकडे, त्यांच्या 10 टक्के जनतेला पुरतील एवढ्याही लशी उपलब्ध नसल्याचं 'गावी'ने स्पष्ट केलं आहे.

निम्म्याहून अधिक देशांकडे, त्यांच्या 10 टक्के जनतेला पुरतील एवढ्याही लशी उपलब्ध नसल्याचं 'गावी'ने स्पष्ट केलं आहे.

निम्म्याहून अधिक देशांकडे, त्यांच्या 10 टक्के जनतेला पुरतील एवढ्याही लशी उपलब्ध नसल्याचं 'गावी'ने स्पष्ट केलं आहे.

  नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : सध्या जगभरात कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटमुळे (Corona new Variant) चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. याबाबत 'गावी'चे (GAVI) प्रमुख डॉ. सेठ बेर्कले (Seth Berkley) यांनी सर्वांचं समान लसीकरण करण्याची गरज व्यक्त केली आहे. “डेल्टा (Delta) किंवा ओमिक्रॉन (Omicron) यांसारख्या व्हॅरिएंट्सचा सामना करण्यासाठी केवळ श्रीमंत व्यक्तींचं वा श्रीमंत भागातल्या नागरिकांचं लसीकरण न करता सर्वांचंच लसीकरण (Vaccination of all is must) करणं गरजेचं आहे,” असं मत त्यांनी न्यूज18शी बोलताना व्यक्त केले. “जोपर्यंत जगातल्या लोकसंख्येचा मोठा भाग कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून (Corona vaccination) वंचित राहील, तोपर्यंत असे नवे व्हॅरिएंट्स येतच राहतील. त्यामुळे जोपर्यंत सर्वजण सुरक्षित नाहीत, तोपर्यंत कोणीच सुरक्षित नाही,” असंही ते म्हणाले.

  ‘गावी’ म्हणजे, 'ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन्स'ने जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ (UNICEF) आणि सीईपीआय (Coalition for Epidemic Preparedness Innovations) यांच्यासोबत मिळून कोव्हॅक्स प्रोग्रामला (COVAX programme) प्रायोजित केलं आहे. कोव्हॅक्स प्रोग्राम हा जगभरात व्हॅक्सिन पुरवण्यासाठीचं एक व्यासपीठ आहे. आतापर्यंत कोव्हॅक्स प्रोग्रामच्या माध्यमातून 56.3 कोटी लस गरीब आणि मध्यम अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये पोहोचवण्यात आल्या आहेत.

  वाचा : Omicron ने वाढवली चिंता, नागपूर जिल्ह्यात प्रवेशासाठी आता लसीकरण अन् RTPCR बंधनकारक

  अमेरिकन संसर्गरोगतज्ज्ञ बेर्केले यांच्याशी कोरोना म्युटेशन आणि लसीकरणाबाबत न्यूज18ने बातचीत केली. या वेळी ते म्हणाले, “ओमिक्रॉनबाबत (Omicron variant) आपल्याला अजून बरीच माहिती नाही; पण एक मात्र नक्की, की जोपर्यंत जगभरातले बहुतांश नागरिक लसीकरणापासून वंचित राहतील, तोपर्यंत कोरोनाचे नवे व्हॅरिएंट्स येत राहणार. त्यामुळेच सर्वांना समान लसीकरण (Equity in Vaccination is necessary) देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करणं गरजेचं आहे. शिवाय हे तातडीने आणि वेगाने करणं आवश्यक आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं. “यासाठी मोठ्या देशांनी जास्तीत जास्त लस उत्पादन करणं आणि ते छोट्या देशांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तसंच, छोट्या देशांनीही आपल्या सर्व नागरिकांपर्यंत ती लस प्रभावीपणे पोहोचेल, याचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे,” असंही ते म्हणाले.

  वाचा : मुंबईत Omicron Variant चं अस्तित्त्व?, मुंबईकरांना पाहावी लागणार आठवडाभर वाट

  या सर्व प्रक्रियेत समन्वय असण्याची गरज 'गावी'ने व्यक्त केली आहे. कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा मोठ्या देशांनी लसपुरवठा केला, तेव्हा त्यांनी अगदीच कमी कालावधीची पूर्वकल्पना देऊन हा लससाठा त्या देशांमध्ये पोहोचवला होता. तसंच, त्यातला बहुतांश लससाठा लवकर एक्सपायर होणार होता. त्यामुळे त्यातल्या बहुतांश लशी नागरिकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. विशेष म्हणजे, कोरोनाचा नवा व्हॅरिएंटही आफ्रिकेमध्येच (Corona Africa variant) आढळून आला आहे.

  तसंच, जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असल्याचं दिसत असलं, तरी निम्म्याहून अधिक देशांकडे, त्यांच्या 10 टक्के जनतेला पुरतील एवढ्याही लशी उपलब्ध नसल्याचं 'गावी'ने स्पष्ट केलं. चाड, रिपब्लिक ऑफ कांगो, हैती, दक्षिण सुदान आणि येमेन या गरीब राष्ट्रांकडे तर त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या 2 टक्केही लशी उपलब्ध नसल्याचं 'गावी'ने सांगितले.

  'गावी'ने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगातले सुमारे 16.7 कोटी नागरिक आपापल्या देशांच्या लसीकरण मोहिमांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नागरिकांना जागतिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवणं गरजेचं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Corona, Coronavirus, Vaccination