Home /News /maharashtra /

चिंता वाढवणारी बातमी, भिवंडीत वृद्धाश्रमातील 69 वृद्धांना Corona ची लागण

चिंता वाढवणारी बातमी, भिवंडीत वृद्धाश्रमातील 69 वृद्धांना Corona ची लागण

मातोश्री वृद्धाश्रमातील (old age home) 69 वृद्धांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

    ठाणे, 28 नोव्हेंबर:  एकीकडे कोरोनाच्या (Corona Virus) नव्या ओमिक्रॉन (Omicron Variant) नव्या व्हेरिएंटनं सर्वाचीच चिंता वाढवली आहे. भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील पडघा येथील मातोश्री वृद्धाश्रमातील (old age home) 69 वृद्धांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील तब्बल 69 वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खडवली येथील नदीकिनारी मातोश्री वृद्धाश्रम असून त्या ठिकाणी सुमारे 100 हून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध वास्तव्यास आहेत. हेही वाचा- पुणे सोलापूर महामार्गावर Terrible Accident, 5 जागीच ठार; 6 गंभीर जखमी गेल्या आठवड्यात येथील काही जणांना ताप येऊ लागल्याने उपचार सुरू करून ही एका वृद्धाचा ताप कमी न झाल्यानं त्यांची कोरोना चाचणी केली. चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह निघाल्यानं खबरदारी म्हणून वृद्धाश्रम व्यवस्थापनाने सर्वांचीच चाचणी केली. सर्वांची चाचणी केल्यानंतर त्यापैकी तब्बल 69 वृद्धांना कोरोना लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाची लागण झालेल्या सर्वांना उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती वृद्धाश्रम व्यवस्थापक अशोक पाटील यांनी दिली आहे. कोरोनासाठी राज्य सरकारची संपूर्ण नवी नियमावली दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा घातक व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे. हेही वाचा- IPL 2022: धोनीच्या सहकाऱ्यानं 9 सिक्स लगावत केली बॉलरची थट्टा, CSK लवकरच देणार बक्षीस राज्यात कोविड-19 या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत. राज्य शासन तसंच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसंच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम व दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Bhiwandi, Thane

    पुढील बातम्या