Home /News /maharashtra /

मुंबईत 24 तासांत 7 मृत्यू; राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 868

मुंबईत 24 तासांत 7 मृत्यू; राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 868

जगातल्या अनेक देशांमध्ये वेग वेगळी लक्षणे दिसत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच उपचार व्हायला पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं.

जगातल्या अनेक देशांमध्ये वेग वेगळी लक्षणे दिसत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच उपचार व्हायला पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं.

राज्यात आज कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत 70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

    बई, 6 एप्रिल : राज्यात आज कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण कोरोनारुग्णांची संख्या त्यामुळे 868  झाली आहे. आतापर्यत  70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आज दिवसभरात राज्यात 7 जणांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. हे सगळे रुग्ण मुंबई आणि परिसरात दाखल होते. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या 52 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंचा तपशील मुंबई - 04 वसई-विरार - 01 ठाणे - 01 नवी मुंबई - 01 1) बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एका 41 वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला अतिरिक्त मद्यपानामुळे यकृताचा आजारही होता शिवाय तो अपस्माराचा रुग्ण होता. 2) बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एका 622 वर्षीय पुरुषाचा 4 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब , डाव्या अंगाचा पॅरालिसिस हे आजारही होते . 3) मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उच्च रक्तदाब असणाऱ्या 80 वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला. 4) नवी मुंबई येथील 72 वर्षीय पुरुषाचा मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि हृदयरोग हे आजारही होते. 5) मुंबईच्या नायर रुग्णालयात नालासोपारा येथील एका 9 महिन्याच्या गरोदर मातेचा (वय ३० वर्षे) मृत्यू 4 एप्रिलला संध्याकाळी झाला. 6) मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात 4 एप्रिल रोजी संध्याकाळी एका 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या दुस-या आठवडयात त्यांनी राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली होती. त्यांना दोन वर्षापासून मधुमेहाचा आजार होता. 7) महानगरपालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयात आज सकाळी अंबरनाथ येथील 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णाने उत्तर प्रदेश मध्ये प्रवास केला होता आणि त्याला मधुमेहाचाही त्रास होता. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 52 झाली आहे. 70 जण झाले बरे टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 17,563 नमुन्यांपैकी 15,808 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 868 जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे उद्धव ठाकरे CMOमध्येही घेताहेत अतिदक्षता, तयार केला नवा प्लान सध्या राज्यात 32,521 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 3498  जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये म्हणजे रुग्णालय किंवा सरकारी संस्थांमध्ये आहेत. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर  शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 8 जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीम मधील आहे. क्लस्टर कंटेन्मेंट राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. ‘आम्हाला क्षमा करा’, डॉक्टरांवरील दगडफेकीनंतर मुस्लीम संघटनेचा माफीनामा राज्यात या प्रकारे एकूण 2855 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 10 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. सर्वाधिक मृत्यू वृद्ध पुरुषांचे राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा राज्यात कालपर्यंत झालेल्या 45 मृत्यूंच्या विश्लेषणातून पुढील महत्वपूर्ण निष्कर्ष निघतात – 1.    एकूण मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाण (73 %) एवढे आहे. 2.    45 वर्षाखालील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून साधारणपणे म्हणजे 60% मृत्यू हे 61 वर्षावरील व्यक्तींचे आहेत. 3.    कालपर्यंत झालेल्या एकूण 45 मृत्यूंपैकी साधारणपणे 78 टक्के व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजारही होते. 4.    60 वर्षांवरील आणि मधुमेह – उच्च रक्तदाब असे आजार असणा-या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता या विश्लेषणातून अधोरेखित झाली आहे. हेही वाचा चिंता वाढली.. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त, सरकारने घेतला मोठा तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती! काही ठिकाणी Coronavirus तिसऱ्या स्टेजमध्ये
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या