Home /News /maharashtra /

चिंता वाढली.. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त, सरकारने घेतला मोठा निर्णय

चिंता वाढली.. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त, सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबईत दिवसागणिक वाढणारे कोरोनाबाधित आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरबाबत सरकारची चिंता वाढली आहे.

  मुंबई, 6 एप्रिल: कोरोना व्हायरसने मुंबईत अक्षरश: थैमान घातलं आहे. लॉकडाऊन असूनही कोरोन रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे तर कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत दिवसागणिक वाढणारे कोरोनाबाधित आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरबाबत सरकारची चिंता वाढली आहे. मृत्यू दर कमी कसा करता, येईल यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, सरकारने यबाबत उच्च स्तरीय समिती नेमली आहे. हेही वाचा..पुण्याच्या आयुक्तांचा मोठा निर्णय; शहराचा पूर्व भाग पूर्ण सील सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर आता राज्य सरकारसाठी चिंतेची बाब झाली आहे. राज्यात मृत्यूदर अपेक्षा पेक्षा जास्त होताना दिसत आहे. मृत्यूदर कमी कसा करता येईल, यासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. डॉक्टरांची हाय पॉवर समिती केंद्र सरकारच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलपेक्षा आणखी काही जास्त केलं पाहिजे का, याबाबत ही उच्चस्तरीय समिती अभ्यास करेल. त्याचप्रमाणे मृतांमध्ये मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असे आजार असलेले रुग्ण जास्त आहेत. त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या कोमॉर्बिडीटी म्हणजे पूर्वीचा आजार हे प्रमुख कारण समोर आलं आहे. याबाबतही समिती अभ्यास करुन लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे. हेही वाचा.. CoronaUpdates: मुंबईत आणखी धोका वाढला, 24 तासांत आढळले 57 कोरोनाबाधित नवे रुग्ण दुसरीकडे, मुंबईतील जेजे, केईएम यासारख्या रुग्णालयातील लोकांच्या मदतीने सरकारला सल्ला देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती मृतांचा आकडा कसा कमी करता येऊ शकेल, याबाबत सरकारला सल्ला आणि सूचना देईल. मुंबईत आणखी धोका वाढला.. मुंबईत कोरोना व्हायरसचा धोका आणखी वाढला आहे. सोमवारी 4 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासांत कोरोनाचे 57 नवे रुग्ण आढळले आहेत. एवढेच नाही तर 150 संशयीत रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दिलासादायक म्हणजे पूर्णपणे बरे झालेल्या 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 500 च्यावर पोहोचली आहे. तर एकट्या मुंबईत कोरोनामुळे 36 जणांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा...CM उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेला ‘मातोश्री’चा परिसर BMCने केला सील

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Coronavirus symptoms

  पुढील बातम्या