मराठी बातम्या /बातम्या /देश /

तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती! देशात काही ठिकाणी Coronavirus तिसऱ्या स्टेजमध्ये

तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती! देशात काही ठिकाणी Coronavirus तिसऱ्या स्टेजमध्ये

'जगाच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती बरी असली, तरी काही भागात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी आहे. तिथे कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात झाली आहे.'

'जगाच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती बरी असली, तरी काही भागात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी आहे. तिथे कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात झाली आहे.'

'जगाच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती बरी असली, तरी काही भागात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी आहे. तिथे कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात झाली आहे.'

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

नवी दिल्ली, 6 एप्रिल : देशात वेळेवर लॉकडाऊन जाहीर केला असला, तरी देशाच्या काही भागात Coronavirus तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असल्याची चिंताजनक माहिती, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. 'जगाच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती बरी असली, तरी काही भागात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी आहे, असं गुलेरिया म्हणाले.

'आज तक'शी बोलताना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे AIIMS संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले, "संपूर्ण देशाचा विचार केला, तर सध्या भारत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मध्ये आहे. लोकलाइज्ड स्प्रेड असं त्याला म्हणतात." पण कोरोनाव्हायरसची लागण कुठून झाली याचा कुठलाही थांग लागत नसलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. हे तिसऱ्या टप्प्याचं लक्षण आहे. "मुंबईचा काही भाग आणि देशातले कोरोना हॉटस्पॉट ठरलेले भाग इथे मात्र हा कम्युनिटी स्प्रेड इतक्या झपाट्याने होतो आहे की तिथे या साथीने तिसरी स्टेज गाठली आहे", असं गुलेरिया म्हणाले.

तज्ज्ञांच्या मते, हा लोकलाइज्ड कम्युनिटी स्प्रेड आहे तिथेच रोखला आणि तो आणखी इतर परिसरांमध्ये पसरू दिला नाही, तर भारत बराच काळ दुसऱ्या टप्प्यात राहू शकतो आणि कोरोनाग्रस्तांची संख्या स्थिर राहू शकते.

वाचा - Lockdown पोलिसांच्या पथकावर टवाळखोरांचा हल्ला, IPS अधिकारी जखमी

कोरोनाव्हायरसचा फैलाव ज्या वेगाने होतो, त्या वेगानुसार ही साथ कुठल्या टप्प्यात आहे हे ओळखता येतं आणि त्यानुसार उपाययोजना करता येतात. भारतात आता हळूहळू चाचणीचं प्रमाण वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. कोरोना विषाणूचा फैलाव गुणाकार पद्धतीने वाढतो. त्याला डबलिंग इफेक्ट म्हणतात. अत्यल्प काळात रुग्णांची संख्या दुपटीने वाढते. हा डबलिंग इफेक्ट वाढला की तिसरा टप्पा जवळ आला असं समजलं जातं.

वाचा - भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटात : रघुराम राजन

तबलिगी जम्मातच्या मेळाव्यामुळे दिल्लीत कम्युनिटी स्प्रेडच्या केसेस वाढल्या. मुंबईतही काही भागात हा संसर्ग कम्युनिटी स्प्रेड टप्प्यात आलेला दिसतो. त्यामुळे आता चिंता वाढली आहे. घरात बसणे आणि शक्य तेवढा बाहेरचा संपर्क टाळणे हाच यावरचा प्रभावी उपाय आहे.

तुम्ही लढला तर कोरोनाही हरतो, जगभरातील अडीच लाख लोकांनी दाखवून दिलं!

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus