जाहिरात
मराठी बातम्या / देश / ‘आम्हाला क्षमा करा’, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील दगडफेकीनंतर मुस्लीम संघटनेचा माफीनामा

‘आम्हाला क्षमा करा’, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील दगडफेकीनंतर मुस्लीम संघटनेचा माफीनामा

‘आम्हाला क्षमा करा’, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील दगडफेकीनंतर मुस्लीम संघटनेचा माफीनामा

कोरोनाबाबत तपासणीसाठी वैद्यकीय टीम या भागात गेली होती. यावेळी जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली होती

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदूर, 6 एप्रिल : मध्य प्रदेशातील इंदूर येथील टाटपट्टी बाखल परिसरात काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाची टीम कोरोना (Covid -19) संसर्गित नागरिकांची तपासणी करण्यासाठी गेली होती, तेथे जमावाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या टीमवर दगडफेक केली. या घटनेनंतर केवळ इंदूरच नाही तर देशातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली होती. टाट पट्टी बाखल येथे घडलेल्या घटनेनंतर इंदूरचे प्रमुख मुस्लीम संघटनने वर्तमानपत्रात माफीनामा छापला आहे. सार्वजनिक स्वरुपात डॉक्टर आणि नर्ससह सर्वांकडून मुस्लीम संघटनेने घडलेल्या घडनेबद्दल माफी मागितली आहे. सध्या देशभरात कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अशावेळी वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर जीवाची पर्वा न करता आपलं काम करीत आहे. मात्र आरोग्य टीमवर हल्ला केल्यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केला होता. संबंधित -  पुण्यात महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिसऱ्या दिवशीच झाला मृत्यू मुस्लीम संघटनेने छापलेल्या या माफीनाम्यात लिहिले आहे की, डॉ. तृप्ती कटारिया, डॉ. जकिया सैयदसह सर्व डॉक्टर, नर्स, मेडिकल टीम, शासन-प्रशासनातील सर्व अधिकारी, सर्व पोलीस कर्मचारी, आशा-आंगणवाडी, संस्था आणि सर्वजण कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तुमची माफी करू मागू, आमच्याकडे शब्द नाहीत. विश्वास ठेवा आम्ही घडलेल्या घटनेबाबत दिलगीरी व्यक्त करतो. कळत-नकळत काही अफवांमुळे झालेल्या या घटनेबाबत आम्ही क्षमा मागतो.

News18

यापुढे लिहिले आहे की, ‘आम्ही मनापासून तुमची माफी मागतो. आम्हाला क्षमा करा. आम्ही केलेला गुन्हा सुधारू शकत नाही, मात्र भविष्यात समाजातील प्रत्येक उणीवा कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.’ संबंधित -  CoronaUpdates: मुंबईत आणखी धोका वाढला, 24 तासांत आढळले 57 कोरोनाबाधित नवे रुग्ण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात