कोरोनामुळे उद्धव ठाकरे CMOमध्येही घेताहेत अतिदक्षता, तयार केला नवा प्लान

कोरोनामुळे उद्धव ठाकरे CMOमध्येही घेताहेत अतिदक्षता, तयार केला नवा प्लान

कोरोनाचा रूग्ण आढळल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' च्या आसपासचा संपुर्ण परिसर तातडीने सील करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई 06 एप्रिल : मुंबईत कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे. रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारही युद्धपातळीवर तयार करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसभर आढावा बैठका घेत आहेत. आज मुख्यमंत्र्याचं निवास्थान असलेल्या कलानगर परिसर सील करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून आता मुख्यमंत्री कार्यालयाने अंतर्गत कामकाजासाठी खास प्लान तयार केला आहे. सर्व कर्मचाऱ्यांची माहिती कोटेकोरपणे ठेवली जात असून कामकाजात कुठलीही बाधा येवू नये यासाठी सर्व दक्षता घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातील सर्व 180 कर्मचाऱ्यांचं शेड्युल बदलण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन सर्व कर्मचारी आळिपाळीने बदलले जाण्याची शक्यता आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमधीलही पोलीस बदलण्याची शक्यता आहे. मातोश्री कलानगर परीसरातच कोरोना विषाणू बाधीत रूग्णं आढळल्यामुळे मुख्यमंत्री व्यवस्थापन कार्यालयाने सर्व कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्थेतल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून त्याची तंतोतंत अंमलबजावणी करा असे निर्देश दिले गेले आहेत.

मुंबईत रूग्णांची संख्या वाढण्याची भीती, जितेंद्र आव्हाड यांनी घेतला मोठा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' च्या आसपासचा संपुर्ण परिसर बीएमसीकडून आज तातडीने सील करण्यात आला आहे. बांद्याच्या प्रसिद्ध कलानगर मध्ये मातोश्री आहे. कलानगर बाहेर असलेल्या चहा विक्रेत्याची प्रकृतीची बिघडल्याने BMCने ही खबरदारी घेतली आहे. ही टपरी मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर आहे. या संपूर्ण भागात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. पोलीस आणि पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात आकडा 41 ने वाढला

कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ड्रायव्हरला सुट्ट दिली होती. ते स्वत:च कार चालवत बैठकांना उपस्थित राहत आहेत. भेटी गाठीही त्यांनी या आधीच बंद केल्या असून फक्त महत्त्वाच्या बैठकांनाच ते उपस्थित राहत आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहे.

First published: April 6, 2020, 8:08 PM IST

ताज्या बातम्या