मुंबई, 14 एप्रिल : राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ठाकरे गट शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर येणार आहेत. या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र दोन्ही पक्षात निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी मविआतील हे दोन महत्त्वाचे नेते भेटणार असल्याचं बोललं जात आहे. या निमित्तानं भाजपविरोधात आघाडी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न होणार आहे. भाजपविरोधात आघाडी राहुला गांधी यांनी अनेकदा सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांची ही भूमिका ठाकरे गट शिवसेनेसाठी अडचणीची ठरत आहे. ठाकरे गट काँग्रेसच्या या भूमिकेवर अधिक अक्रमकपणे प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला आहे. मात्र भाजपविरोधात एकत्र यायचे झाल्यास हा दुरावा कमी करावा लागणार आहे. यासाठीच आता राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे भेटणार असल्याची माहिती सूंत्राकडून मिळत आहे.
राहुल गांधींच्या बैठकीला पवार गैरहजर दरम्यान दुसरीकडे राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला शरद पवार अनुपस्थित होते. आपण या बैठकीला का गौरहजर होतो याचं स्पष्टीकरण देखील शरद पवार यांनी दिलं आहे. मला इथे महत्त्वाचं काम होतं त्यामुळे मी बैठकीला हजर राहु शकलो नाही. मात्र आम्ही सर्व एक आहोत मी राहुला गांधी यांची भेट घेणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या नाराजीची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.