मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलं खास गिफ्ट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलं खास गिफ्ट

पाच वर्षे सत्तेत शिवसेना-भाजप एकत्र दिसली आता मात्र शिवसेना सत्ताधारी बाकांवर आणि भाजप विरोधी बाकावर आहे.

  • Share this:

मुंबई,5 मार्च:राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून पहिल्या आठवड्यात विरोधकांनी सत्ताधारी बाकांवर असलेल्या नेत्यांना वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. पाच वर्षे सत्तेत शिवसेना-भाजप एकत्र दिसली आता मात्र शिवसेना सत्ताधारी बाकांवर आणि भाजप विरोधी बाकावर आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खास गिफ्ट दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा...'उडता महाराष्ट्र': बिस्किट, निमंत्रण पत्रिका, बांगड्यांमधून अंमली पदार्थांची तस्करी

विरोधक पहिल्या दिवसापासून विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन करत आहेत. सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात घोषणा देत आहेत. बीजी गोंधळामध्ये विधानसभेत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कर्जमाफी अवकाळी पाऊस यावरून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही म्हणून जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी झाल्यावर आमदार लॉबीत चंद्रकांत पाटील आले होते. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाण्याच्या गोळ्या आवर्जून दिल्या. तुम्ही गुरुजी भागावर आहात, घसा कोरडा पडू नये म्हणून आवर्जून घ्या आणि खा,असा सल्ला मुख्यमंत्री ठाकरे यांनी चंद्रकांत दादांना दिला. यापूर्वीच विरोधी बाकावर असताना कसा कोरडा होईपर्यंत घोषणा देत असो, त्यावेळी आमचे आमदार आम्हाला खाण्याच्या गोळ्या देत होत्या, अशी आठवण याच अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांतदादा यांना गोळ्या दिल्याने याची चर्चा आमदार लॉबीत चांगलीच रंगली होती.

हेही वाचा..भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश

दुसरीकडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावरील पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. 'मुख्यमंत्री म्हणून बोलण्याची संधी आणि वेळही फडवणीस साहेब तुमच्यामुळेच आली,' असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात लगावला होता. तसेच पुढील 5-10 वर्ष तुम्ही पुस्तकच लिहा, असा सल्लाही दिला होता. त्याची विधिमंडळामध्ये चर्चा सुरू असतानाच आज मात्र भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

'सहकारातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सर्व चकवा देणारे आहेत. त्यांच्याशी फार नाद करू नका. तुम्ही भाजपाच्या विचारांचे आहात परत एकदा मागे या... परत या... परत या,' अशी साद मुनगंटीवार यांनी विधानसभेतच घातल्याने सभागृहात पुन्हा एकदा ठाकरे आणि भाजप चर्चेचा विषय झाला.

हेही वाचा..मुंबई-पुणेकरांनो, डेक्कन एक्स्प्रेसने टाकली कात, असं आहे नवं रूप आणि नवा रंग!

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर वारंवार भाजपाच्या नेत्यांवर टीका केली आहे. फडणवीस यांच्या अर्थसंकल्पीय पुस्तकावर आधारित प्रकाशन सोहळ्यातही नोटबंदीचा विषय काढत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका केली.

First published: March 5, 2020, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading