पुणे, 05 मार्च : मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेसने रुपडं आजपासून बदलण्यात आलं आहे. बाहेरून लाल रंग तर आतून आकाशी निळ्या रंगांची बैठक व्यवस्था ही अधिक आरामदायी, सुरक्षित प्रवास यामुळं प्रवासी खूश झाले. डेक्कन एक्स्प्रेस नव्या रूपातील नव्या ढंगात आज सजली आहे. नव्याने सजलेल्या या डेक्कन एक्सप्रेसमध्ये 17 ऐवजी 16 कोचेस असणार आहे. मात्र, तरीही जागा तेवढीचं राहणार आहे. आज मुंबईहून प्रवास करून पुण्यात पोचलेल्या प्रवाशांनी या बदलाचे स्वागत केलं आहे. दरम्यान, AC चेयरकारमधील रंगसंगती आकर्षक आहे. आपोआप उघडणारे दरवाजे,बायो केमिकल टॉयलेट ही डेक्कनची नवीन वैशिष्ट्ये आहेत. याआधी सिंहगड एक्स्प्रेसचं रुपडं बदललं होतं. आता डेक्कन एक्स्प्रेस नव्या अवतारात आली आहे. लवकरच डेक्कन क्वीनही रूप बदलणार आहे. दख्खन एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाची एक प्रवासी सेवा आहे. डेक्कन एक्स्प्रेस गाडी पुणे ते मुंबई दरम्यान दर दिवशी धावते. दररोज हजारो प्रवाशी मुंबईहुन पुणे आणि पुण्याहुन मुंबईला प्रवास करतात. दोन्ही स्थानकादरम्यान या ट्रेनची 6 स्थानके आहेत. पुणे - मुंबई दरम्यान सिंहगड, प्रगती, दक्खनची रानी, इंद्रायणी, इंटर्सिटी ह्या आणखी 5 ट्रेन दर दिवसी धावतात आणि प्रवाश्यांना सेवा देतात. पुणे शहर दक्खनच्या पठारावर वसलेले आहे. म्हणून या गाडीला डेक्कन एक्स्प्रेस हे नाव दिलेले आहे. एकूणच पुणे मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेची ही अनोखी भेट म्हणावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.