**बीड,5 मार्च:**केजच्या भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह पती डॉ.विजय प्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याचे करण्याचे आदेश केज प्रथमवर्ग न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाच्या विरोधात ठोंबरे दाम्पत्याने अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र हा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. लहुरी येथे स्थापन करण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावर बनावट स्वाक्षरीच्या आधारे आपली नेमणूक केल्याच्या कथित संचालक गणपती कांबळे यांच्या फिर्यादीवरुन माजी आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ.विजय प्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीसह इतर गुन्हे नोंद करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश केज न्यायालयाने दिले होते. हेही वाचा.. उबर कॅब ड्रायव्हरला वाटेतच लागली झोप, महिलेने स्वत: 150 किलोमीटर चालवली कार संगीता ठोंबरे या लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत. तर डॉ. विजय प्रकाश ठोंबरे या सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. मात्र, या सूतगिरणीचे संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याची तक्रार त्यांनी न्यायालयात केली होती. बनावट स्वाक्षरी केल्यामुळे शासनाचीही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी केला होता. हेही वाचा.. ‘उडता महाराष्ट्र’: बिस्किट, निमंत्रण पत्रिका, बांगड्यांमधून अंमली पदार्थांची तस्करी बीड जिल्ह्यातील केज येथील लोकनेते गोपीनाथ राव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची नोंद करताना बोगस स्वाक्षरी व बनावट प्रस्ताव केल्याप्रकरणी भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केज न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तेच आदेश अंबाजोगाई जिल्हा व सत्र कायम ठेवल्याने ठोंबरे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्ष माजी आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती विजय प्रकाश ठोंबरे यांची लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची नोंद करताना बनावट प्रस्ताव तयार केला. प्रस्ताव प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग औरंगाबाद व संचालक वस्त्रोद्योग नागपूर यांच्याकडे दाखल केला. गणपती सोनाप्पा कांबळे यांना सूतगिरणीचे संचालक दाखवून त्यांच्या नावासमोर बनावट स्वाक्षरी केली होती, असा ठोंबरे दाम्पत्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. हेही वाचा.. ‘उद्धव ठाकरे परत या…परत या’, भाजप नेत्याने भर विधानसभेत साद घातल्याने जोरदार चर्चा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.