मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'उडता महाराष्ट्र': बिस्किट, निमंत्रण पत्रिका, बांगड्यांमधून अंमली पदार्थांची तस्करी

'उडता महाराष्ट्र': बिस्किट, निमंत्रण पत्रिका, बांगड्यांमधून अंमली पदार्थांची तस्करी

बिस्किट, निमंत्रण पत्रिका, बांगड्या यासारख्या वस्तूंमधून अंमली पदार्थांची तस्करी होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बिस्किट, निमंत्रण पत्रिका, बांगड्या यासारख्या वस्तूंमधून अंमली पदार्थांची तस्करी होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बिस्किट, निमंत्रण पत्रिका, बांगड्या यासारख्या वस्तूंमधून अंमली पदार्थांची तस्करी होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई,5 मार्च: बिस्किट, निमंत्रण पत्रिका, बांगड्या यासारख्या वस्तूंमधून अंमली पदार्थांची तस्करी होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या राज्याचा 'उडता महाराष्ट्र' होऊ देणार नाही, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिलं.

महाराष्ट्राला अंमली पदार्थांचा विळखा पडू देणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर पावलं उचलत आहे, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. यासंदर्भात काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अनिल देशमुख यांनी सांगितलं की, राज्यात अंमली पदार्थांची तस्करी विविध मार्गानं होत आहे, कुरियरप्रमाणेच बिस्किट, निमंत्रण पत्रिका, बांगड्या यासारख्या वस्तूंमधून अंमली पदार्थांची तस्करी होते, अशी माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली. अंमली पदार्थांची राज्यात तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकांवरील खटले जलदगतीनं पूर्ण करण्याची विनंती संबंधित न्यायमूर्तींना केली जाईल, असंही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा...ATM मध्ये पैसे काढण्यासाठी मुलगा जाताच हल्लेखोराने साधला डाव, आईसोबत केलं असं

राज्यात महिला अत्याचारात वाढ...

-सन 2018 मध्ये महिलांवर अत्याचाराच्या 35,497 घटना घडल्या.

-सन 2019 मध्ये हे प्रमाण वाढून 37,567 घटना घडल्या.

-सन 2018 मध्ये बलात्काराचे गुन्हे 4974 होते ते वाढून वर्ष 2019 मध्ये 5412 झाले.

-अपहरण आणि पळवून नेणे ह्यात लक्षणीय वाढ

-सन 2018 मध्ये 6825 गुन्ह्यांची नोंद झाली. ती वाढून 2019 मध्ये 8382 झाली.

- हुंडाबळीचं प्रमाण मात्र कमी झालं. 2018 मध्ये 200 ते 2019 मध्ये 187 घटना झाल्या.

हेही वाचा...निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीची तारीख ठरली; चौथ्यांदा जारी केलं डेथ वॉरंट

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मांडला प्रस्ताव..

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासंदर्भात विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत प्रस्ताव मांडला. स्त्रियांच्या सामाजिक विकासात येत असणारे अडथळे, यामुळे मुख्यत: होणारे बालविवाह व यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यामुळे त्यांची पत्नी, मुले-मुली यांची होणारी परवड तसेच बालक-बालिका तथा किशोरवयीन मुलींची होणारी छेडछाड, हल्ले, अपहरण, बलात्कार, खून, कौंटुबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी शोषण, सायबर गुन्हे याबाबत प्रतिबंधक उपाययोजना, याबाबत दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याबाबत आवश्यक पावले उचलण्याची आवश्यकता, तसेच आदिवासी, अनुसूचित जाती, जमाती यांच्यावर होणारे अत्याचार व त्यासाठी आवश्यक उपाययोजना त्यातील दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्यासाठी निर्भया फंड व निधीची आवश्यकता याबाबत सामाजिक संघटनांच्या सहभागाने उपाययोजना करण्याचे चिंतन, निधी, मनुष्यबळ यांसह कृती संकल्प विधिमंडळ करीत आहे.

दुसरीकडे, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर महिलांच्या प्रस्तावावर आक्रमक भूमिका घेतली. यामुळे सभागृहात गोंधळ उडला. बोलू न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा विरोधकांनी घोषणा दिल्या.

हेही वाचा...उबर कॅब ड्रायव्हरला वाटेतच लागली झोप, महिलेने स्वत: 150 किलोमीटर चालवली कार

First published: