जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'ते तर म्हणाले होते मी काहीच केलेलं नाही, मग...'; राऊतांवरील ED च्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

'ते तर म्हणाले होते मी काहीच केलेलं नाही, मग...'; राऊतांवरील ED च्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

'ते तर म्हणाले होते मी काहीच केलेलं नाही, मग...'; राऊतांवरील ED च्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, की संजय राऊतांची (Sanjay Raut) चौकशी सुरू आहे. त्यांना अटक होते की नाही हे मलाही माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 31 जुलै : पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. सकाळपासून ईडीचे अधिकारी राऊत कुटुंबीयांची चौकशी करत आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना दोन वेळा समन्स बजावला होता. समन्स बजावल्यानंतरही संजय राऊत हे ईडीच्या चौकशीला हजर राहिले नाही. आज ईडीच्या टीमने सकाळी 7 वाजताच संजय राऊत यांच्या भांडुप येथील घर गाठले. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अनिल देशमुख, नवाब मलिकांच्या बाजूला शिवथाळी खाण्यासाठी तयार राहा’, नितेश राणेंचा राऊतांना खोचक टोला एकनाथ शिंदे म्हणाले, की संजय राऊतांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी होऊ द्या. त्यांना अटक होते की नाही हे मलाही माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही.’ पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ‘ते तर म्हणाले होते मी काहीच केलेलं नाही. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला असायला पाहिजे. ते ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार बोलत होते. आज चौकशी होऊ द्या. त्यातून जे पुढे येईल ते तुम्हाला कळेलच. ते महाविकासआघाडीचे मोठे नेते होते. दररोज सकाळी 9 वाजता तुम्ही त्यांची बाईट घेत होते.’ ‘बाळासाहेब ठाकरेंची नाही, शरद पवारांची शपथ घ्या..’; रामदास कदमांची राऊतांवर सडकून टीका ईडीने ही कारवाई केली तर मी शिवसेना सोडणार नाही, असं ट्विट संजय राऊतांनी केलं होतं. यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, केंद्रीय तपास संस्थांनी यापूर्वीही काही कारवाया केल्या आहेत. त्यांनी सुडाने काम केलं असतं आणि चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असती तर न्यायालयाने त्यांना लगेच दिलासा दिला असता. आमच्यापैकी एका आमदाराने तरी सांगितलं का की ईडीने नोटीस पाठवली म्हणून आम्ही तिकडे गेलो? असा सवालही एकनाथ शिंदेंनी यावेळी बोलताना केला आणि ही कारवाई सुडाने केली गेली नसल्याचं म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात