औरंगाबाद 31 जुलै : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी आज सकाळपासून ईडीचं पथक दाखल झालं आहे. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत कोणाला घाबरत नाहीत. ते ईडीला सामोरे जातील, असा टोला कदम यांनी लगावला आहे.
संजय राऊतांना अटक होईल का? ED पुढे काय करणार? मोठी माहिती आली समोर
'कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना रामदास कदम म्हणाले, की संजय राऊतांनी भ्रष्टाचार केला नसेल तर मग कशाला घाबरायचं. त्यांनी बाळासाहेबांऐवजी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती, असा टोलाही कदम यांनी लगावला.
आपल्या मनातील खदखद बाहेर काढताना कदम म्हणाले, निधी वाटपात अन्याय होत असताना राऊत का नाही बोलले. सेना संपली तरी चालेल पण राष्ट्रवादीवर नाही बोलणार, असं त्यांनी ठरवलं. शिवसेना फोडण्याचं आणि संपवण्याचं काम संजय राऊत तुम्हीच केलं.
हिशेब तर द्यावाच लागेल, संजय राऊतांवरील कारवाईने सोमय्या सुखावले
पत्राचाळीचा हजार कोटींचा घोटाळा आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी यापूर्वी केली होती. यात गोरेगावचा आमचाही एक नेता होता. उद्धव साहेबांच्या भोवती कोण बडवे आहेत, गद्दार कोण आहेत, हे माहिती आहे. संजय राऊत शिवसैनिक नाहीत तर पवारांचे आहेत, असंही ते म्हणाले. संजय राऊतांनी शिवसेना सोडून अन्य कुणाची भांडी घासू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ramdas kadam, Sanjay raut