जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chitra Vagh and Uorfi Javed : अखेर चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल, उर्फीला पोलिसांनी चौकशीला बोलावलं

Chitra Vagh and Uorfi Javed : अखेर चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल, उर्फीला पोलिसांनी चौकशीला बोलावलं

Chitra Vagh and Uorfi Javed : अखेर चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल, उर्फीला पोलिसांनी चौकशीला बोलावलं

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जानेवारी : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात मागच्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर  युद्ध सुरू आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर कित्येक दिवस या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नव्हती आता पोलिसांनी याची दखल घेत उर्फी जावेदला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मुंबईतील अंबोली पोलिसांनी आज (दि.14) हजर राहण्यास सांगितले आहे.

जाहिरात

उर्फी जावेदला नोटीस देत अंबोली पोलीसांनी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सोशल मीडियातील युद्ध आता पोलीस ठाण्यापर्यंत  गेले आहे. चित्रा वाघ यांच्या नोटीसीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलीस आयुक्तांनी याची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज उर्फी जावेद हजर झाल्यानंतर तिला अटक झाल्यास हे वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :  अनुष्का शर्माला का जावं लागलं हायकोर्टात? प्रकरण नेमकं आहे तरी काय? सर्व माहिती एका क्लिकवर

मागच्या काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका करत तिची पोलिसांत तक्रार दिली होती. यानंतर  चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्याच चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली होती. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फी जावेद प्रकरणात लक्ष घालणार नसल्याचं स्पष्ट मत मांडलं.  

जाहिरात

चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात वाद

यावरून नंतर चित्रा वाघ आणि रूपाली चाकणकर यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. त्यानंतर आता अभिनेत्री उर्फी जावेद स्वत: राज्य महिला आयोगाच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जिथे दिसेल तिथे तिचं तोंड फोडेनं असं वक्तव्य केलं होतं.

हे ही वाचा :  Kartik Aaryan: अन् कार्तिक आर्यनने परेश रावलच्या जोरदार कानाखाली लगावली; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा

त्यानंतर आता चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी महिला आयोगात धाव घेतली आहे. उर्फीचे वकील सातपुते यांनी चित्रा वाघ यांच्यावर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात