मुंबई, 13 जानेवारी : कार्तिक आर्यनच्या बहुचर्चित ‘शेहजादा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेहजादा चित्रपटात कार्तिक सोबत क्रिती सेनन आणि परेश रावल सुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. शेहजादाचा ट्रेलर एक दिवस आधी आला असून त्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटातील कार्तिक आर्यनचा लूक आणि त्याची अॅक्शन लोकांना पसंत पडली आहे. आता कार्तिक आर्यन आणि परेश रावल यांच्यामध्ये घडलेला एक मजेदार किस्सा समोर आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कार्तिक असा एक सिन आहे ज्यात कार्तिक आर्यनने परेश रावल यांना जोरदार थप्पड मारली आहे. आता एवढ्या सिनियर अभिनेत्याच्या कानाखाली लागवणं काही कार्तिक साठी सोप्प काम नव्हतं. हाच प्रसंग कसा शूट करण्यात आला याविषयी कार्तिकने खुलासा केला आहे. हेही वाचा - Bigg Boss 16: बिग बॉस मध्ये मोठा ट्विस्ट; एकाचवेळी ‘हे’ तीन स्पर्धक घेणार घरातून एक्झिट यावर कार्तिक आर्यनने खुलासा करत सांगितलं कि, ’ तेव्हा मी पण घाबरलो होतो. पण परेशजींचे आभार कि सीन खूप छान शूट झाला. पण त्याआधी मला हा सिन कसा करायचा ते समजत नव्हतं. मी गोंधळून गेलो होतो. आम्ही प्रत्यक्षात गालावर चापट मारत नाही. अशा प्रकारचे सिन एका विशिष्ट पद्धतीने शूट केले जातात, ज्यामुळे तुम्हाला विश्वास बसतो की मी त्याला खरंच मारलं आहे. पण त्यामध्ये देखील चूक होऊ शकते. पण सहकलाकारांमध्ये विश्वास असायला हवा आणि तो वेळेचा खेळ आहे. अशा कॉमिक टायमिंगचे परेश रावल राजा आहेत.’
कार्तिक आर्यन पुढे म्हणाला, ‘सीन शूट होण्यापूर्वी ते मला म्हणाले, ‘टेन्शन घेऊ नकोस. चित्रपटातील तुझ्या भूमिकेत जा आणि जोरात मार. त्यामुळे मला खूप मदत झाली.’ कार्तिक आर्यनने सांगितले की, शेहजादामधील हा सीन पाहण्यासारखा असेल. ते दृश्य चित्रपटाच्या मुख्य भागांपैकी एक आहे.
कार्तिक आर्यन आणि परेश रावल व्यतिरिक्त शहजादामध्ये क्रिती सेनॉन, मनीषा कोईराला आणि रोनित रॉय यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा 10 फेब्रुवारी 2023 रोजी जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या 2020 च्या ब्लॉकबस्टर ‘अला वैकुंठापुरमुलू’ चा अधिकृत रिमेक आहे. भूषण कुमार व्यतिरिक्त अल्लू अरविंद, एस राधा कृष्णा, अमन गिल आणि कार्तिक आर्यन यांनी देखील या चित्रपटाची निर्मिती केली आहे.