बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. परंतु यावेळी अभिनेत्री कोणत्याही चित्रपटांमुळे नव्हे तर सरकारी कारणामुळे चर्चेत आहे.
अनुष्काला विक्री कर अर्थातच सेल्स टॅक्स विभाकडून नोटीस मिळाली होती. याबाबत आता अनुष्काने हायकोर्टात धाव घेतली आहे. जाणून घेऊया काय आहे नेमकं प्रकरण.
सन २०१२ ते २०१६ या कालावधीत विक्री कर विभागाने अभिनेत्री अनुष्का शर्माविरोधात ऍक्शन घेत तिला काही कर भरण्याचा आदेश देण्यात आला होता.
आता अभिनेत्रीने या नोटिसलाच आवाहन देत हायकोर्टात धाव घेतली आहे. या नोटीसविरोधात आता हायकोर्टाने विक्री कर विभागाला उत्तर देण्यास सांगितलं आहे.
येत्या ६ फेब्रुवारीला या प्रकरणातील पुढील सुनावणी होणार आहे. तसेच हायकोर्टाने पुढील ३ आठवड्यांत विक्री कर विभागाला उत्तर देण्यास सांगितलं आहे.
विक्री कर विभागाने अनुष्काला ५ टक्के कर भरण्यास सांगितलं होतं. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की, अनुष्काने काही प्रोडक्टस प्रमोट केले आहेत. आणि तिने काही पुरस्कार सोहळे होस्ट केले आहेत. परंतु ती त्याबाबतीत कर देऊ इच्छित नाही.
यावर उत्तर देत अनुष्काने म्हटलं आहे, 'मी या कार्यक्रमात फक्त एक कलाकार म्हणून काम केलं आहे. या व्हिडिओंचे सर्व अधिकार निर्मात्यांकडे असतात. तेच त्याचे मालक असतात. त्यामध्ये आमची काहीच भूमिका नसते'.