जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अजितदादांची रंगली चर्चा अन् बावनकुळेंनी दिलं ग्रीन सिग्नल, केलं मोठं विधान

अजितदादांची रंगली चर्चा अन् बावनकुळेंनी दिलं ग्रीन सिग्नल, केलं मोठं विधान

बावनकुळेंचा ग्रीन सिग्नल?

बावनकुळेंचा ग्रीन सिग्नल?

अजित पवार यांनी आज अचानक सासवड दौरा रद्द केला. तर दुसरीकडे बावनकुळे हे दिल्लीला पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

मुंबई, 17 एप्रिल : गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आज अजित पवार यांनी आपले सासवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले. ते तिथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार होते. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान आता यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

…तर त्यांचं स्वागत   भाजपच्या विचारधारेनुसार काम करणार असेल तर पक्षात कोणीही आलं तरी हरकत नाही. भाजपमध्ये सर्वांसाठी स्थान आहे. आमच्याकडे देश देव धर्माला मानणारे आले तर त्यांचं स्वागत आहे. आमच्याकडे विचारधारेवर काम करावं लागतं असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

संजय राऊत यांची प्रतिक्रिया दरम्यान अजित पवार हे भाजपसोबत जाणार का या प्रश्नावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटत नाही अजित पवार हे भाजपसोबत जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सोबतच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. मात्र राष्ट्रवादीमधील काही जण भाजपमध्ये जाऊ शकतात असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं.  दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी अजित पवार नाराज नसल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात