शेती (Sheti) हा भारतीय समाजाचा आत्मा असल्यानं देशातले अनेक राजकीय नेते शेतकरी कुटुंबातून आलेले दिसतात. भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांपैकीच एक आहेत. त्यांचा जन्म 13 जानेवारी 1969 रोजी नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातल्या खसाळा इथं एका मराठा तेली कुटुंबात झाला. नागपूरजवळच्या कोराडी (Koradi) इथं त्यांनी बीएस्सी ही पदवी घेतली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या बावनकुळे यांचा राजकीय प्रवास वेगळा आहे.
बावनकुळे यांचा व्यवसाय शेतीचा; मात्र आवड आणि कार्यक्षेत्र राजकारण. 1988प