मुंबई, 24 जून : शिवसेनेतील (shiv sena) बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे शिंदे यांनाच विचारावे लागेल, राज्यात ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्या टीव्हीवरच दिसतात, आपला त्याच्याशी संबंध नाही शरद पवार , संजय राऊत (sharad pawar, sanjay raut) यांना जरा जास्तच अभिव्यक्तिस्वातंत्र्य असल्याने ते सतत बोलत असतात. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp president chandrakant patil) यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमागे कोणाचा हात आहे यावर सवाल उपस्थित केला जात आहे.
पाटील पुढे म्हणाले कि, राऊत तर सकाळी एक तर दुपारी दुसरेच बोलतात, शिंदे यांच्यासोबत कोण गेलेत, कोण जाणार आहेत, कोण परत येणार आहेत याबाबत आपल्याला काहीही माहित नाही. राज्यात सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला नसून तसा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस हे गेले तीन दिवस सतत कार्यकर्त्यांच्या कामासाठी दिल्लीला जात आहेत. शिवसेनेतील बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे शिंदे यांनाच विचारावं लागेल, राज्यात ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्या टीव्हीवरच दिसतात, आपला त्याच्याशी संबंध नाही शरद पवार , संजय राऊत यांना जरा जास्तच अभिव्यक्तिस्वातंत्र्य असल्याने ते सतत बोलत असतात राऊत तर सकाळी एक तर दुपारी दुसरेच बोलतात, शिंदे यांच्यासोबत कोण गेलेत, कोण जाणार आहेत, कोण परत येणार आहेत याबाबत आपल्याला काहीही माहित नाही.
शिंदे यांच्यासोबत मोहित कांबोज असतील तर ते एकनाथ शिंदे यांचे मित्र असल्याने सोबत असतील. कांबोज हे सर्व पक्षातील नेत्यांचे मित्र आहेत त्यामुळे कदाचित ते सर्वत्र दिसतात. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला नाही, प्रस्ताव आला तर पक्षाची 13 जणांची कार्यकारणी आहे, त्यापुढे चर्चा करून तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल. मी सध्या कोल्हापुरात आलो आहे, माझे रुटीन कार्यक्रम सुरू आहेत ,काही राजकीय हा हालचाली भाजपकडून सुरू असते तर मला कोल्हापुरात येऊ दिले असते का.
हे ही वाचा : शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक; उद्धव ठाकरेंनी रणनिती बदलली?
आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा काय म्हणाले?
आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, यावेळी महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की नाही, हे मला माहीत नाही, असे हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी थेट सांगून टाकले. याचबरोबर हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकते. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, असेही हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chandrakant patil, Eknath Shinde, Sanjay Raut (Politician), Sharad Pawar (Politician), Uddhav Thackeray (Politician)