Home /News /mumbai /

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक; उद्धव ठाकरेंनी रणनिती बदलली?

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक; उद्धव ठाकरेंनी रणनिती बदलली?

शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात येणार आहे. शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन करण्याचंही विशेष कारण असावं.

    मुंबई, 24 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत 37 हून अधिक आमदार सोबत नेत मोठा धक्का दिला. शिवसेना (Shivsena) मुळ पक्ष आमच्याकडे असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहेत आणि त्याच्या कायदेशीर मान्यतेसाठीही त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांना आमदारांसोबत आता खासदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आता आपली रणनिती बदल्याचं दिसून येत आहेत. तळागळातील कार्यकर्ता ही खरी शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेची हीच ताकद सोबत ठेवण्यासाठी शिवसेनेनं हालचाली सुरु केल्या आहेत. म्हणूनच शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) राज्यभरातील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांची बैठक दुपारी 12 वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आली आहे. शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना भवनात येणार आहे. शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन करण्याचंही विशेष कारण असावं. कारण  शिवसेना भवन शिवसैनिकांसाठी ऊर्जास्त्रोत आहे. अनेक ऐतिहासिक घटना सेना भवनाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते, नेते यांना भावनिक साद घालण्याची देखील येथे प्रयत्न शिवसेनेकडून होईल, असं बोललं जात आहे. बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं पूर्ण आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं माहितीये का? शिंदे गटाने आमदार खासदार यांच्यानंतर स्थानिक पातळीवरही शिवसेनेचे नेते सोबत असल्याचा दावा केला. त्यामुळे शिवसेनेनं आता स्थानिक पातळीवर आपलं लक्ष वळवलं आहे. शिवसेना पक्ष शिंदे गटाकडे जाऊ नये यासाठी हालचाली वाढल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपलं लक्ष आता जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांकडे आपलं लक्ष वळवलं आहे. जेणेकरुन आमदार खासदारांना नगरसेवक आणि स्थानिक कार्यकर्ते शिवसेनेशी जोडून रहावे, हा यामागचा उद्देश असावा अशी चर्चा आहे. Shivsena Bhaskar Jadhav : कोकणातील शिवसनेचा आक्रमक चेहरा कुठेही गेला नाही आम्ही चिपळूनमध्येच एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 हून अधिक आमदार आहेत. परंतू आता राज्यातील 400 हून अधिक नगरसेवक शिंदे गटात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेत फूट पडल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी तो मोठा धक्का मानला जाईल. म्हणूनच शिवसेनेने आपला आपणी रणनिती बदल्याचं बोललं जात आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackarey

    पुढील बातम्या