मुंबई, 24 जून : शिवसेनेत (shiv sena) पडलेल्या उभ्या फुटीला आता एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाचे पारड हळूहळू जड होत चालले आहे. शिंदे यांनी दोन्ही काँग्रेससोबत (ncp and congress) आता सत्तेत रहायचे नाही अशी भुमीका घेत एकनाथ शिंदे यांनी थेट बंडखोरी करत गुवाहाटी (eknath shinde in guwahati) गाठले. दरम्यान मागच्या तीन दिवसांपासून शिवसेनेचे एक एक करत जवळपास 40 आमदार शिंदे यांच्या गोटात घेतले. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह आसाममधील (Assam) गुवाहाटीच्या (Guwahati)हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी एक विधान केले आहे त्याबाबत सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, यावेळी महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की नाही, हे मला माहीत नाही, असे हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी थेट सांगून टाकले. याचबरोबर हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकते. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, असेही हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.
हे ही वाचा : Eknath Shinde Guwahati : एकनाथ शिंदेचे पारडे आणखी जड, मुंबईतील ठाकरेंचा कट्टर समर्थक आमदार नॉट रिचेबल
दरम्यान आसामचे कित्येक पोलीस त्या हॉटेलबाहेर सुरतक्षेसाठी तैणात करण्यात आले आहेत. ते पोलीस कोणाच्या सांगण्यावरू तिथे थांबले आहेत. तसेच जे शिवसैनिक गुवाहाटीला जात आहेत त्या शिवसैनिकांना पोलीस धरत असल्याचे समोर येत आहे. ह्या कारवाया कोणाच्या सांगण्यावरून होत आहेत याबाबतही चर्चा केली जात आहे. हिंमत बिस्वा यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये तथ्य असेल तर बंडखोर आमदार फिरायला गेले आहेत का हा सवाल उपस्थित केला जात आहे.
असम में कई अच्छे होटल हैं, वहां कोई भी आकर ठहर सकता है...इसमें कोई दिक्कत नहीं है। मुझे नहीं पता कि महाराष्ट्र के विधायक असम में रह रहे हैं या नहीं। अन्य राज्यों के विधायक भी असम में आ सकते हैं और रह सकते हैं: असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, दिल्ली pic.twitter.com/Z68Ne8d4fo
— ANI_HindiNews (@AHindinews) June 23, 2022
मुंबईतील कट्टर सेना आमदार ही शिंदे यांच्या गटात
मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दिलीप लांडे हे मुंबईतील चांदिवली मतदारसंघाचे, दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे, दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. हे मागच्या 24 तासांपासून नॉट रिचेबल आहेत.
हे ही वाचा : एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का; हे 34 बंडखोर आमदार ठरणार अपात्र?
एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे अरवींद सांवत यांनी केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असुन सुद्धा न आल्याचं कारण देत शिवसेनेकडून 12 आमदारांविरोधात कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Sanjay Raut (Politician), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)