कंगनाच्या याचिकेवर उद्यापासून सुनावणी, संजय राऊतांना मात्र 1 आठवड्याची मुदत

कंगनाच्या याचिकेवर उद्यापासून सुनावणी, संजय राऊतांना मात्र 1 आठवड्याची मुदत

'तुम्ही वेळ मागता पण कारवाई मात्र लगेच करता, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने महापालिकेचे कान टोचले

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Bollywood Actress Kangana Ranaut)हिनं दाखल केलेल्या याचिकेवर उद्यापासून मुंबई हायकोर्टात (Mumbai High court) सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेनं (BMC)वांद्रे येथील पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयात पाडापाडी केली होती. या कारवाईविरोधात कंगना हायकोर्टात धाव घेतली होती. तर शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई महापालिकेला याप्रकरणी उत्तर देण्यासाठी हायकोर्टानं एक आठवड्याची मुदत दिली आहे.

हेही वाचा...बॉलिवूडमध्ये 'दम मारो दम'; NCB च्या रडारवर 50 सेलिब्रिटीज व प्रॉड्यूसर

कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी मुंबई महापालिकेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी दुपारी सुनावणी होणार आहे.

हायकोर्टानं टोचले कान...

कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी मुदत मिळावी, अशी विनंती महापालिकेनं हायकोर्टात केली होती. 'तुम्ही वेळ मागता पण कारवाई मात्र लगेच करता, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेचे कान टोचले आहे.

दरम्यान, कंगना रणौतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेनं काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाच्या तळमजल्यावरील 12 अनधिकृत बांधकाम जेसीबी आणि बुलडोझरच्या सहाय्यानं कारवाई केली होती. यावेळी कंगनाच्या कार्यलयाबाहेर मोठा पोलिस फौजफाटा देखील तैनात करण्या आला होता.

कंगनानं 2017 मध्ये हा बंगला विकत घेतला होता. या बंगल्याच्या दुरुस्तीच्या नाववर बेकायदा अंतर्गत बदल करण्यात आले होते. हा बंगला निवासी असून त्यात बेकायदा व्यावसायिक वापर केल्याचा ठपका महापालिकेनं ठेवला आहे. दरम्यान, या तोडकामाचा खर्चही कंगनाकडून वसूल करण्यात येईल, असंही महापालिकेनं म्हटलं होतं.

कंगनाला आणखी एक झटका...

दुसरीकडे मुंबई महापालिकेनं (BMC) कंगनाला आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे. कंगना रणौतच्या पाली हिल येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामावर बीएमसीनं बुलडोझर फिरवला होता. 24 तासांच्या नोटिशीनंतर बीएमसीनं ही कारवाई केली होती. त्यानंतर बीएमसीनं कंगनाच्या खार येथील फ्लॅटमध्ये केलेल्या बेकायदा बांधकामावरून नोटिस बजावली आहे.

बीएमसीच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कंगना हिनं खार येथील आपल्या फ्लॅटमध्ये बीएमसीचे नियम धाब्यावर ठेऊन बांधकाम केलं आहे. तिनं अक्षरश: नियमांचा पायमल्ली केली आहे. दरम्यान, कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयावर बीएमसीनं केलेल्या कारवाईवर 25 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

मुंबईताल खार वेस्ट येथील DB Breeze (Orchid Breeze)च्या 16 नंबर रोडवरील एका बिल्डिंगमध्ये कंगना रणौतचा एक फ्लॅट आहे. बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर कंगना राहाते. विशेष म्हणजे पाचव्या मजल्यावर कंगनाचे एकूण तीन फ्लॅट आहेत. त्यापैकी एक फ्लॅट 797 sqft दुसरा फ्लॅट 711sqft आणि तिसरा फ्लॅट 459 sqft आहे. तिन्ही फ्लॅट्स कंगनाच्या नावावर आहेत. 8 मार्च 2013 रोजी तिन्ही फ्लॅटची रजिस्ट्री झाली होती. कंगना हिनं फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 13 मार्च 2018 रोजी बीएमसीकडे एक तक्रार आली होती. तिनं फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकाम केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.

हेही वाचा...मुंबईकरांसाठी खूशखबर! पाणीसाठा 98 टक्क्यांवर, 4 तलाव तुडूंब भरली

तक्रार मिळाल्यानंतर 26 मार्च 2018 रोजी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या या फ्लॅट्सची पाहाणी केली होती. त्याच दिवशी कंगनाला BMC under 53/1 of MRTP act for unauthorized construction beyond plan नुसार नोटिस बजावण्यात आली होती. या नोटिशीला 27 मार्च 2014 रोजी बीएमसीच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती

Published by: Sandip Parolekar
First published: September 24, 2020, 1:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading