मुंबई, 24 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh rajput) याच्या मृत्यूच्या तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. त्यानंतर सध्या बॉलिवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शनबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. सुशांत प्रकरणात NCB ने रिया चक्रवर्तीची चौकशी केली. या चौकशीदरम्यान सुशांत व ड्रग्जच्या कनेक्शनबरोबरच अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. ही नावं ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती (rhea chakraborty), ड्रग पेडलर्ससह अन्य जणांना अटक केली आहे. सांगितले जात आहे की अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या (NCB) रडारवर कमीत कमी 50 हून अधिक सेलिब्रिटी आहेत. यामध्ये बड्या निर्मात्यांबरोबरच दिग्दर्शकांचाही समावेश आहे. अमली पदार्थाबाबत तपास करीत असलेल्या एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोनसह श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि अन्य जणांचा चौकशीसाठी समन्स पाठविला आहे. एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. हे ही वाचा- पूनम पांडेला पतीने केली मारहाण, लग्न…हनिमूनच्या 21 दिवसांनंतर झाली अटक एनसीबीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की पादुकोनला शुक्रवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आलं आहे. एनसीबीच्या तपासादरम्यान D N S K अशी नावं समोर आली आहे. त्यामुळे आता एनसीबी त्या दिशेनं आपला तपास सुरू आहे. D म्हणजे बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि K म्हणजे तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश. दीपिकाचे करिश्मासोबत ड्रग्जसंबंधी चॅट समोर आले आहेत. त्यामुळे करिश्मा आणि दीपिका दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. 25 सप्टेंबरला दीपिकाची चौकशी होणार आहे. ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानचं नावही समोर आलं. सारा एका हाय प्रोफाइल ड्रग पेडलरच्या संपर्कात होती. ज्याचा एनसीबी शोध घेत आहे. सुशांतने सारासह केदारनाथ फिल्ममध्ये काम केलं होतं. रियाने आपल्या जबाबात सांगितलं की, केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूर्वीही तो ड्रग्ज घेत होता, मात्र त्यानंतर त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं.एनसीबीने आता साराला 24 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.