मुंबई, 24 सप्टेंबर: मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचं धुमशान तूर्तास थांबलं आहे. या पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडाली होती. मात्र, आता मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. ती म्हणजे मुंबईसह उपनगरांना पाणी पुरवठा करणारी मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात तलावात झालेल्या जोरदार पावसामुळे 14 लाख 26 हजार 526 दशलक्ष लिटर्स पाणी साठा आहे. जवळपास 98 टक्के हा जलसाठा आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. त्याच बरोबर पाणीकपातीच संकटही लवकरच दूर होईल, अशी शक्यताही वतर्वली जात आहे.
हेही वाचा...'चौकशीसाठी समन मिळालाच नाही', रकुल प्रीत सिंह कारणं देत असल्याचा NCBचा आरोप
मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडकर सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी धरणांत एकूण 1426526 दशलक्ष लिटर्स पाणी साठा आहे. समाधानकारक बाब म्हणजे तुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे चार तलाव आतापर्यंत ओव्हर फ्लो झाले आहेत. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात महापालिकेनं 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता.
कुलाबा वेधशाळेत 23 सप्टेंबरपर्यंत 2589.4 मिमि तर सांकाक्रूझ हवामान केंद्रात 3604 पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांत आतापर्यंत एकूण 2480 मिमि पाऊस झाल्याची नोंद मुंबई महापालिकेच्या स्वयंचलित केंद्रांवर नोंद घेण्यात आली आहे.
जोरदार पावसाचा इशारा...
मुंबईसह उपनगरांत पुढील 24 तासांत आकाश ढगाळ राहून अधूनमधून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या काही सही तीव्र असण्याची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.
महिनाभर पडणारा पाऊस अवघ्या 8 ते 12 तासांत
मुंबईत उद्भवलेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. सप्टेंबरमध्ये जितका पाऊस होतो तितका एका दिवसांत म्हणजेच 80 टक्के पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर मुंबईत पंपिंग स्टेशनसोबत आता मुंबईत फ्लड कंट्रोल टॅंक उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी जमिनीचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
तुळशी तलाव इतके पाणी मुंबईतून उपसा केला जात असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला. पाऊस पडल्यावर पुढे काय करायचं? यावर आदित्य यांनी मनपा अधिकाऱ्यां चर्चा केली. क्लायमेंट चेंज प्रकार दिसत असल्याचं आदित्य यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा...'वैद्यनाथ'ला 11 कोटींची थकहमी, श्रेयवादावरून मुंडे बहीण-भावात वादाची ठिणगी
आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, मुंबईत महिनाभर पडणारा पाऊस अवघ्या 8 ते 12 तासांत पडला आहे. एवढा मोठा पाऊस पडल्यावर पुढे काय करायचं यावर आदित्य ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अतिवृष्टीमुळे मुंबईत पाणी साचलं आहे. धारावी व दादरमध्ये 332 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. पावसाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, मुंबई.mumbai rain