मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियानंतर आणखी एका टीमविरुद्ध बरसला कोहलीचा सहकारी, बॅटींग आणि बॉलिंगमध्ये केली कमाल पण...

टीम इंडियानंतर आणखी एका टीमविरुद्ध बरसला कोहलीचा सहकारी, बॅटींग आणि बॉलिंगमध्ये केली कमाल पण...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2021) भारतीय बॅट्समनना त्रस्त करणारा न्यूझीलंडचा ऑल राऊंडर काईल जेमिसनचा (Kyle Jamieson) जबरदस्त फॉर्म कायम आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2021) भारतीय बॅट्समनना त्रस्त करणारा न्यूझीलंडचा ऑल राऊंडर काईल जेमिसनचा (Kyle Jamieson) जबरदस्त फॉर्म कायम आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2021) भारतीय बॅट्समनना त्रस्त करणारा न्यूझीलंडचा ऑल राऊंडर काईल जेमिसनचा (Kyle Jamieson) जबरदस्त फॉर्म कायम आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2021) भारतीय बॅट्समनना त्रस्त करणारा न्यूझीलंडचा ऑल राऊंडर काईल जेमिसनचा (Kyle Jamieson) जबरदस्त फॉर्म कायम आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विटालिटी ब्लास्ट (Vitality Blast) स्पर्धेत जेमिसननं त्याच्या टीमसाठी घातक बॉलिंग केली त्यानंतर आक्रमक बॅटींग केली,  तरीही तो टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याचे प्रयत्न एक रननं कमी पडले.

जेमिसन या स्पर्धेत सरे टीमचं प्रतिनिधित्व करतो. ग्लेमोर्गन विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये सरेचा अगदी निसटता पराभव झाला. ग्लेमोर्गननं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धीरित ओव्हर्समध्ये 9 आऊट 152 रन केले. या टार्गेटचा पाठलाग करताना जेमिसननं आठव्या क्रमांकावर येऊन केलेल्या फटकेबाजीमुळे सरेच्या आशा वाढल्या होत्या. जेमिसननं फोर आणि सिक्सचा वर्षाव केला. पण, अगदी शेवटच्या बॉलवर तो आऊट झाल्यानं सरेचा 1 रननं पराभव झाला.

सरेला शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी 2 रनची आवश्यकता होती. त्यावेळी जेमिसननं आऊट झाला. त्यापूर्वी त्याने फक्त 15 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 31 रन काढले होते.

सरेकडून ओली पोपनं सर्वात जास्त 60 रन काढले. तर ग्लेमोर्गनकडून बिली रुटनं नाबाद 41तर डेव्हिड लॉयडनं 41 रन काढले. किरण कार्लसननं 16 बॉलमध्ये 32 रनची आक्रमक खेळी केली. कार्लसनला जेमिसननं आऊट केलं.

IPL 2021: T20 वर्ल्ड कपने सर्व आयपीएल फ्रँचायझींची चिंता वाढली

टॉयलेटमध्ये लपला होता जेमिसन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला, पण या सामन्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही टीमचे खेळाडू तणावात होते. याच तणाव आणि भीतीमुळे न्यूझीलंडचा जेमिसन काही वेळ टॉयलेटमध्ये लपला होता. या सामन्यात 7 विकेट घेणाऱ्या काईल जेमिसनला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. गोल्ड एएमवर कंट्री स्पोर्ट ब्रेकफास्ट या कार्यक्रमात बोलताना जेमिसनने फायनलच्या अखेरच्या दिवसाचा किस्सा सांगितला.

'मॅच बघणं हा तेव्हा सगळ्यात कठीण गोष्ट होती आणि मी त्याचा भाग होतो. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो. टीव्हीवर काही क्षण उशीरा सामना दिसत होता. मैदानात उपस्थित असलेले भारतीय प्रेक्षक एवढा आवाज करत होते, जशी काही विकेटच गेली, पण त्या बॉलला एक रन यायची किंवा डॉट बॉल असायचा. मॅच बघणं खूप कठीण होतं. मी अनेकवेळा बाथरूममध्ये जाऊन लपायचा प्रयत्न केला, कारण तिकडे अजिबात गोंगाट नव्हता. यामुळे मला काही काळ यापासून लांब जाता आलं, कारण तिथली परिस्थिती खूप तणावपूर्ण होती,' असं जेमिसन म्हणाला.

First published:

Tags: Cricket, India, International, New zealand, Sports