Home /News /ahmednagar /

अखेर नगरमध्ये भाजपची सत्ता गेली, महाविकास आघाडीचा फडकला पालिकेवर झेंडा

अखेर नगरमध्ये भाजपची सत्ता गेली, महाविकास आघाडीचा फडकला पालिकेवर झेंडा

    अहमदनगर, 30 जून: अहमदनगर महानगरपालिकेत (Ahmednagar Mayor Election) अखेर महाविकास आघाडीची (MVA Government) सत्ता आली आहे. राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेनं (Shivsena) एकत्र येत भाजपला सत्तेवरून खाली खेचले आहे. महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे (Rohini Shendge as mayor) तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले (Ganesh Bhosle) यांची निवड झाली आहे. नगर महापालिकेमध्ये याआधी भाजप-राष्ट्रवादी आणि बसपाची सत्ता होती. पण जास्त संख्याबळ बळ असतानाही शिवसेना सत्ते पासून दूरच होती. अहमदनगर महानगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूत्र हालली आहेत, आज पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ऑनलाइन पद्धतीने ही निवडणूक घेतली आहे. त्या नंतर आज अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे यांनी महाविकास आघाडीच्या महापौर झाल्या असून उपमहापौर पदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांनी निवड झाली आहे. WTC चे नवे नियम जाहीर, ‘ही’ चूक केली तर फायनलची संधी जाणार अहमदनगर महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला सर्वात जास्त जागा असतानासुद्धा राष्ट्रवादी भाजप आणि बसपाने सत्तेपासून दूर ठेवले होते त्यानंतर राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. या निवडणुकीतही राज्य पातळीवरील मोठ्या नेत्यांनाही अहमदनगर पालिकेच्या निवडणुकीत लक्ष द्यावे लागले. त्यानंतर आता महाविकास आघाडी पालिकेची सत्ता आली आहे. नगर पालिकेची संख्याबळ शिवसेना:- 23 राष्ट्रवादी:-19 भाजप:- 15 काँगेस:-5 बसपा:-4 सपा:- 1 रिक्त:- 1
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Ahmednagar, Election, Maharashtra, Mumbai, NCP, Pune

    पुढील बातम्या