मुंबई, 5 जानेवारी : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक होते, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं. अजित पवारांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसादही उमटत आहेत. भाजपने अजित पवारांविरोधात आंदोलन केलं. तर भाजप नेते नितेश राणे यांनी यावरून थेट अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना 'टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, त्याची उंची किती तो बोलतो किती?', असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आता अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी देखील खोचक टोला लगावला आहे.
अजित पवारांना टोला
'अधिकृत धरणवीर ही पदवी दिल्यानंतर अजित पवार यांचा थयथयाट होणारच होता. औरंग्याच्या प्रेमात हे एवढे आहेत की येत्या 14 फेब्रुवारीला हे औरंगजेबसोबत व्हॅलेन्टाईन्स डे साजरा करतील एवढं याचं टोकाचं प्रेम आहे. जेव्हा शत्रूवर समोरून वार करण्याची हिंमत नसते तेव्हा असे हालके-फुलके वार केले जातात, हे आता सर्व जुनं झालं, अशा शद्बात नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा : 'टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला...', अजित पवारांनी काढली नितेश राणेंची 'उंची'
अजित पवार यांनी काय म्हटलं होतं?
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक होते, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं. अजित पवारांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसादही उमटत आहेत. भाजपने अजित पवारांविरोधात आंदोलन केलं. तसचं भाजप नेते नितेश राणे यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर बोलताना अजित पवार यांनी नितेश राणे यांना जोरदार टोला लगावला होता. 'टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, त्याची उंची किती तो बोलतो किती?', असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, BJP, NCP, Nitesh rane, Sharad Pawar