मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला...', अजित पवारांनी काढली नितेश राणेंची 'उंची'

'टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला...', अजित पवारांनी काढली नितेश राणेंची 'उंची'

छत्रपती संभाजी राजेंबाबत केलेल्या विधानावरून भाजपने अजित पवारांना टार्गेट केलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवरून अजित पवार चांगलेच संतापले आहेत.

छत्रपती संभाजी राजेंबाबत केलेल्या विधानावरून भाजपने अजित पवारांना टार्गेट केलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवरून अजित पवार चांगलेच संतापले आहेत.

छत्रपती संभाजी राजेंबाबत केलेल्या विधानावरून भाजपने अजित पवारांना टार्गेट केलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवरून अजित पवार चांगलेच संतापले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 जानेवारी : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक होते, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं. अजित पवारांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसादही उमटत आहेत. भाजपने अजित पवारांविरोधात आंदोलन केलं, तसंच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

भाजप आमदार नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून अजित पवार, शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केलं. नितेश राणे यांनी एक पत्र ट्वीट केलं आहे, यात त्यांनी औरंगजेबाने तोडलेल्या मंदिरांची यादी दिली आहे. 'काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर ‘ नाहीत असे घोषीत करतो', असं नितेश राणे या पत्रात म्हणाले आहेत.

नितेश राणेंच्या या टीकेवर अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले. 'टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, त्याची उंची किती तो बोलतो किती?', असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे.

नितेश राणेंचं पत्र

मुंब्रारक्षक मा. जिंतेद्र आव्हाडाजी

वंदे मातरम

आपण औरंगजेबाबाबत ”औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?“ असे केलेले वक्तव्य

स्वाभिविकच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे!

कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही.

काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर ‘ नाहीत असे घोषीत करतो.

औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्यातरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले.

आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदीरांची यादी देत आहे. मला खात्री आहे, आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही.

जय जिजाऊ जय शिवराय

औरंगजेबाने तोडलेली हिंदू मंदीरे

सोमनाथ मंदीर

कृष्ण जन्मभूमी मंदीर

काशी विश्वनाथ मंदीर

विशश्वेर मंदीर

गोविंददेव मंदीर

विजय मंदीर

भीमादेवी मंदीर

मदन मोहन मंदीर

चौंषष्ठ योगिनी मंदीर

एलोरो मंदीर

त्र्यंबकेश्वर मंदीर

नरसिंगपूर मंदीर

पंढरपूर मंदीर

First published:

Tags: Ajit pawar, NCP, Nitesh rane, Sharad Pawar