औरंगाबाद, 25 डिसेंबर : विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंडांचा आरोप करण्यात येत आहे. मात्र आता विरोधकांच्या या आरोपांना शिंदे गटाकडून आक्रमकपणे उत्तर दिले जात असल्याचं दिसून येतय. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी याच मुद्दावरून ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला आहे. तसेच त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला. तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टींची चौकशी केली नाही. उलट एकनाथ शिंदे यांना त्रास दिल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. . तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टींची चौकशी केली नाही. उलट एकनाथ शिंदे यांना त्रासच दिला. आता त्यांची सत्ता आहे, त्यांच्या कामाचा झंजावत सुरू असल्यानं अशापद्धतीचे रिकामे आरोप करण्यात येत असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे. सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस चालवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. हेही वाचा : हे तर मोहन भागवत यांच्या….; सुषमा अंधारेंचा वारकऱ्यांवर गंभीर आरोप, वाद आणखी चिघळणार? संजय राऊत यांना टोला दरम्यान यावेळी संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस चालवत आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे नाही तर शरद पवारांचे प्रवक्ते आहेत. ज्या दिवशी शिवसेना संपेल त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे. दरम्यान संजय शिरसाट यांच्या टीकेला आता ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.