मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दोन बड्या नेत्यांची सभा, राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर, तर फडणवीसांचा शिवसेनेवर प्रचंड प्रहार

दोन बड्या नेत्यांची सभा, राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर, तर फडणवीसांचा शिवसेनेवर प्रचंड प्रहार

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फाईल फोटो

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फाईल फोटो

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) जाहीर सभा झाली. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांची मुंबईत सभा झाली. दोन्ही नेत्यांनी आक्रमकपणे त्यांच्या विरोधकांवर टीका केली.

मुंबई, 1 मे : महाराष्ट्र दिनाचं (Maharashtra Day) औचित्य साधत आज महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांच्या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये जाहीर सभा झाल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) जाहीर सभा झाली. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांची मुंबईत सभा झाली. दोन्ही नेत्यांनी आक्रमकपणे त्यांच्या विरोधकांवर टीका केली. पण दोन्ही बड्या नेत्यांनी प्रत्येकी एकाच पक्षाला टार्गेट केलं. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar)) यांच्यावर जातीवादाचा आरोप करत हल्लाबोल केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केली.

देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर प्रचंड टीका

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भव्य अशी 'बुस्टर डोस' सभा आयोजित करण्यात आली आहे. भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पोलखोल यात्रा सुरु आहे. या पोलखोल यात्रेतून भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर सडकून टीका करण्यात येत आहे. याच यात्रेचा एक भाग म्हणून आज 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुंबईच्या सौमय्या मैदानावर देवेंद्र फडणवीस यांची मोठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत देवेंद्र फजणवीस यांनी शिवसेनेवर प्रचंड टीका केली.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

काही लोकांना असं वाटतं ते म्हणजेच महाराष्ट्र आहे. तो त्यांचा गैरसमज आहे. त्यांचा अवमान, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान, मी त्यांना नम्रतेने सांगू इच्छितो, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे अठरा पगड जातीच्या बारा कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केलाय तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र आहे. त्याचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजींचा सन्मान, त्याचा अवमान म्हणजे डॉ. बाबासाहेबांचा अवमान हे लक्षात ठेवण्याची आणि त्यांना आठवण करुन देण्याची वेळ ही आज आली आहे. म्हणून मी त्यांना वारंवार आठवण करुन देवून सांगतो, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मराठी नाही. आणि आज हेही सांगायची वेळ आली आहे की, तुम्ही म्हणजे हिंदूही नाही. पण आज हे म्हणणार नाही. मी हे म्हणणार नाही. मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही. पण मी एवढंच सांगतो तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्व ही एक अशी व्याख्या आहे जी जीवनपद्धत आहे, त्या जीवनपद्धतीने जगातील सगळ्या जु्न्या सभ्यतेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला व्यापत असताना प्रत्येकाला जीवनाचा एक मार्ग दाखवला हे खरं हिंदुत्व आहे. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही हे लक्षात ठेवा.

(रस्त्यावर नमाज पठण चूकच मग गणपती मिरवणुकीचं काय? ब्राह्मण महासंघाचा सवाल)

ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार करता त्यावेळी तुमचे सगळे साथी सवंगडी जेलमध्ये जातात त्यावेळी महाराष्ट्र बदनाम होतो. त्यावेळी महाराष्ट्राचं नाव संपूर्ण भारतात खराब होतं. त्यामुळे शरम वाटली पाहिजे. महाराष्ट्राच्या नावाला बट्टा लावण्याचं काम तुमच्या सरकारमध्ये होतंय. पण त्यांना वाटतं हेच महाराष्ट्र, मराठी आणि हिंदुत्व आहे.

बाबरी मशीद पडली तेव्हा कुठल्या मेळाव्यात होते? असे ते विचारतात. कुणीतरी फार चांगला प्रश्न विचारला. मशिदींवरील भोंगे काढायला सांगितली तर यांची हातभर फाटली आणि सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली. हा देवेंद्र फडणवीस बाबरी मशीद पाडण्यासाठी होता. एवढंच नाही आधीच्या कारसेवेमध्ये याच राममंदिराकरता 18 दिवस पतायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसने घालवले. लाठी, गोळी खाण्याचं काम आम्ही त्यावेळेस केलं. तुम्ही आम्हाला विचारचता बाबरी पाडली तेव्हा तुम्ही कुठे होता? खरं म्हणजे बाबरी मशीद पाडली तेव्हा महाराष्ट्रातला कुठला नेता तेव्हा तिथे गेला होता. खरं सांगा शिवसेनेचा एकही नेता त्याठिकाणी हजर नव्हता. बाबरी मशिद पडली किंवा तो ठाचा पडला तेव्हा कोणावर आरोप होते? 32 आरोपी होते. कोण होते 32 आरोपी? लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, कल्याण सिंग, उमा भारती, राम विलास वेदांती हे आरोपी होते.

या 32 आरोपींमध्ये तुमच्या महाराष्ट्राचा कुठलाच नेता मला पाहायला मिळत नाही. 30-30 वर्षे बाबरीच्या आरोपांमध्ये खटले लढणारे आमचे नेते होते. आमचा दोष काय? आमचा दोष एवढाच आहे की आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही आणि अनुशाषन करता येत नाही. म्हणून आज तुम्हाला सांगतो, कान खोलून ऐकून घ्या, ज्यावेळी संपूर्ण बाबरी ढाचा पडला त्यावेळी सगळ्यांनी निर्णय घेतला, कुणी म्हणालं भाजपने पाडलं, व्हिपने पाडलं. सगळ्यांनी सांगितलं श्रेय घ्यायचं कारण नाही. सगळ्यांनी राम सेवकांनी केलेलं काम आहे. म्हणून भाजपच्या कुठल्याही नेत्याला विचारलं की बाबरीचा ढाचा कुणी पाडला? तर तो शिस्तीत सांगायचा, ढाचा पाडणारे कारसेवक होते. त्याचवेळी कल्याणसिंग यांना ज्यावेळी विचारलं, तेव्हा ते म्हणाले साडेतीन लाख कारसेवक खडे थे, मै कैसे उनपर गोली चलाने देता? वो तो रामसेवक थे. मुझे अभिमान है मैने उनपर गोली चलाने नहीं दी. ते कल्याण सिंग होते त्यांनी रामासाठी आपलं सरकार सोडून दिलं. आणि तुम्ही? ज्यांनी राम खरंच जन्माला आले होते का? असा प्रश्न विचारला त्याच्या मांडीला मांडी लावून बसले. आणि या ठिकाणी राम मंदिराच्या गोष्टी आम्हाला सांगताय.

काय आश्चर्य आहे बघा? महाराष्ट्रात चालीसा म्हटली तर राजद्रोह होतो. ते राणा पती-पत्नी, काय सांगितलं त्यांनी? मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जावून हनुमान चालीसा म्हणतो. त्यांनी मला आधी सांगितलं असतं तर मी म्हटलं असतं जाऊद्या मी माजी मुख्यमंत्री आहे, माझ्या घरासमोर म्हणा. पण मुख्यमंत्र्याच्या घरासमोर आम्ही हनुमान चालीसा म्हणतो म्हटल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लागला. आणि मजेची गोष्ट बघा, काल-परवा आरोपपत्र दाखल केलं त्यात म्हटलं की, यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यामुळे ते राज्य उलथवून टाकत होते म्हणून आम्ही त्यांना जेलमध्ये टाकलं. आता मला एक छोटासा सवाल आहे? हनुमान चालीसा म्हटल्याने रामाचं राज्य उलथवलं जाईल की रावणाचं राज्य? राज्य उलथवण्याकरता ते हनुमान चालीसा म्हणत आहेत असा आरोप आरोपपत्रात जे लिहितात त्यांना माझा एक सवाल आहे तुम्ही एकदा सांगा की, तुम्ही रामाच्या बाजूचे आहाता की रावणाच्या बाजूचे आहात? त्यानंतर असे आरोपपत्र सादर करा.

ते म्हणाले, काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तीसोबत गेलात. हो, आम्ही गेलोत कारण त्यावेळी आवश्यकता होती. त्यावेळी पाकिस्तानने सांगितलं होतं, काश्मीरमध्ये तुम्ही निवडणूक घेऊ शकत नाही. आमच्या सरकारेन निवडणूक घेतली. 60 टक्के मतदान झालं. लोकं निवडून आले. निवडून आल्यानंतर तीन पक्ष होते. तिघांचं एकमेकांशी जमत नव्हतं. पुन्हा पाकिस्तानने सांगितलं, काही झालं तर त्याठिकाणी आम्ही सरकार स्थापन होऊ देणार नाहीत. त्यावेळी आम्ही काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तीला घेऊन सरकार तयार केलं आणि पाकिस्तानला सांगितलं, बघा आम्ही सरकार स्थापन करु शकतो. आणि ज्याक्षणी हे काम पूर्ण झालं त्याक्षणी या सत्तेला लाथ मारुन मेहबुबा मुफ्तीला खाली खेचण्याचं कामही याच भाजपने केलं. 370 कलम काढण्याची ताकद कुणात होती? या देशात एकच वाघ तयार झाला. नरेंद्र मोदी नावाचा त्या वाघाने डंकेकी चोट पर सांगितलं, आम्ही तर लहानपणापासून नारे देत होतो, जहां हुए बलिदान मुखर्जी वह कश्मीर हमारा है. मोदीजींनी आमचं स्वप्न पूर्ण केलं. तिथे कलम ३७० रद्द केलं.

राज ठाकरेंचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्लाबोल

शरद पवार म्हणाले की, आम्ही दोन समाजात दुही माजवत आहेत. हे महाराष्ट्र आणि देशासाठी योग्य नाही. पवार साहेब आपण महाराष्ट्रात जाती-जातीत जे भेद निर्माण करत आहात त्याने जास्त दुही माजतेय. प्रत्येक व्यक्ती जातीत बघायची. हातामध्ये पुस्तक घेतल्यानंतर पुस्तकाचा लेखक कोणत्या जातीचा आहे ते बघून बोलायचं. मी त्यादिवशी जेव्हा बोललो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युट्यूबवरच्या सगळ्या सभा काढून बघा, त्यांना कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय का? आता बोलायला सुरुवात झाली. मी बोलल्यानंतर सुरुवात झाली. काहीतरी व्हिडीओ काढत आहेत. तल्लीन झालेत आणि गीत रामायण ऐकत आहेत आणि बाजूला शिवाजी महाराजांचां पुस्तक ठेवलंय. कशाला खोटं दाखवताय?

मी त्यादिवशी म्हटलं, शरद पवार हे नास्तिक आहेत. लागलं, झोंबलं. जे मला माहिती होतं ते मी बोललो. लगेच देवाचे सगळे फोटो काढले. पुजा करताना आणि नमस्कार करताना. आपली कन्या लोकसभेत माझे वडील नास्तिक आहेत, असं बोलली आहे. आता याहून अधिक काय पुरावा देऊ? जिकडे सभा घेतायत तिथे बोलत आहेत की, राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजेत म्हणून. मी वाचली आहेत. पवार साहेब, तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी तुम्ही वाचल्या आहेत. आख्खी पुस्तकं संदर्भासहीत वाचा म्हणजे तुम्हाला कळेल.

माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते तुम्ही नीट वाचलं ते परिस्थितीला धरुन आहे. व्यक्तीसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणं नव्हे. हा आपला हिंदू धर्म बांधणारा माणूस होता तो. त्याची पूजा करणारा माणूस होता. त्या धर्मामधल्या ज्या गोष्टी होत होत्या त्यावर बोट ठेवणारा माणूस होता की, ही गोष्ट होता कामा नये. माझ्या आजोबा हे भटभिक्षूकीच्या विरोधात होते. धर्म बांधणारा माणूस होता. म्हणून मी आज पवार साहेबांसाठी काही संदर्भ आणले आहेत. या लोकांनी जातीचं विष पसरवलं. महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करणारे माझे आजोबा होते.

जात प्रत्येकाला होती. पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरु झाला. मराठा बांधवाची माथी भडकवायची. जेम्स लेन नावाच्या माणसाचा पुस्तक काढलं. ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देश आणि जगात घराघरापर्यंत पोहोचवले त्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या वृद्धोपकाळात पवारांनी त्रास द्यायला सुरुवात केली. कशासाठी? तर ते ब्राह्मण आहेत म्हणून. आमच्या घरात कधी जातपात शिकवलं नाही. आम्हाला जातीपातीशी घेणंदेणं नाही. तुमच्या मताच्या राजकाणासाठी हे सगळं धुव्रीकरण करायचं तर रायगडावरची समाधी ही कोणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली. टिळकांना तुम्ही ब्राह्मण म्हणून पाहणार आहात का? लोकमान्य टिळकांनी काढलेल्या पहिल्या वृत्तपत्राचं नाव काय? तर मराठा! हे पवार साहेब कधी सांगणार नाहीत.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Maharashtra politics, MNS, Raj raj thackeray, Raj Thackeray