Home /News /pune /

रस्त्यावर नमाज पठण चूकच मग गणपती मिरवणूक, दहीहंडी, दांडिया यांचं काय करणार? ब्राह्मण महासंघाचा सवाल

रस्त्यावर नमाज पठण चूकच मग गणपती मिरवणूक, दहीहंडी, दांडिया यांचं काय करणार? ब्राह्मण महासंघाचा सवाल

मशिदींवरील भोंगे उतविण्याने हिंदुत्वाचे सर्वाधिक नुसकान होईल, अशी स्पष्ट भूमिका आनंद दवे यांनी घेतली आहे.

पुणे, 1 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे (Mosque Speaker) उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या (Aurangabad) आजच्या सभेतही याबाबतचा उल्लेख करत 4 तारखेपासून ऐकणार नाही, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मशिदींवरील भोंगे उतविण्याने हिंदुत्वाचे सर्वाधिक नुसकान होईल, अशी स्पष्ट भूमिका आनंद दवे यांनी घेतली आहे. आनंद दवे नेमकं काय म्हणाले? "भोंगे उतरवणे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळात सुद्धा शक्य झालं नव्हतं. भोंगे उतरवण्याने सर्वाधिक नुकसान हिंदुत्वाचं होईल. आमची भूमिका 3 तारखेला नगर मेळाव्यात मांडू. प्रत्येक गावाची जत्रा, उरूस, ग्राम दैवत यात्रा, गणपतीचे मिरवणूक सहित 12 दिवस, नवरात्रीचे 10, शिवजयंती, संभाजी महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, प्रत्येक जातीच्या युगपुरुषांचे दिवस, त्यांच्या यात्रा, पाडवा यात्रा, दिवाळी पहाट, दहीहंडी हे सगळंच संकटात येईल", अशी भूमिका आनंद दवे यांनी मांडली. (तुमच्यापेक्षा चांगल्या भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो पण..., इम्तियाज जलील यांचा राज ठाकरेंवर पलटवार) "रस्त्यावर नमाज पठण चूकच मग गणपती मंदिर, मांडव, उत्सव, मांडवात होणाऱ्या आरती, त्यापण रस्त्यावरच होत असतात. मिरवणूक, दांडिया यांच काय करणार? स्पिकर खाली आलेच पाहिजेत, तर मग हिंदू उत्सवातले स्पिकर काय करणार?", असे प्रश्न आनंद दवे यांनी उपस्थित केले. राज ठाकरे भोंग्याबद्दल काय म्हणाले? "आज 1 तारीख आहे, 3 तारखेला ईद आहे, मला कोणतेही सणात विष कालवायचे नाही. त्यानंतर 4 तारखेपासून अवघ्या महाराष्ट्रात ऐकणार नाही. तमाम हिंदू बांधवांनी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, नीट ऐकलं नाहीतर वाजवाचं. सगळ्या हिंदू बांधवांना सांगत आहे. आजही परिस्थिती आहे. आज नाहीतर पुन्हा कधी नाही. ही लोक जर 3 तारखेपासून ऐकली नाही तर पोलिसांकडून परवानगी घेऊन जोरात काम करा. हा विषय कायम निकाली लागला पाहिजे", असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या इशाऱ्यावर गृहमंत्री वळसे पाटलांचीदेखील महत्त्वाची प्रतिक्रिया दरम्यान, राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या इशाऱ्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. 'राज्यात भोंगे महत्वाचा नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोगें काढले तर तुमच्या देवाचे कार्यक्रमांचे काय? असा परखड सवाल उपस्थितीत तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेतवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 'राज्यात भोंग्यावरुन राजकारण केलं जातं आहे. भोंगा महत्वाचा नाही मात्र फक्त भोंग्यावरुन हिंन्दु मुस्लिम यांच्यामध्ये राज्यात वाद वाढण्याचा प्रयत्न होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोगें काढले तर तुमच्या देवाचे कार्यक्रमांचे काय होईल, असा प्रश्न उपस्थितीत करत वळसे पाटील यांनी राज ठाकरेंवर निशाना साधला. 'आता जर दुसऱ्याची खपली काढायला गेलो तर आपल्याच अंगावर येणार आहे. अरे...बाबा..हनुमान चालीसा हिंदीत आहे वाचायचीच असेल हनुमान स्त्रोत्र वाचा. असा खोचक टोलाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी राज ठाकरे यांना लगावला.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या