मुंबई, 23 जून- संपूर्ण जगात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. भारतात या विषाणूची लागण होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात बाबा रामदेव यांनी कोरोनावर पहिलं औषध शोधलं असल्याचा दावा केला आहे. ‘कोरोनिल’ हे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी बनवलेले एक औषध रामदेव बाबा यांनी मंगळवारी लॉन्च केलं आहे. या विषाणूचा हरवण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रामदेव बाबांच्या औषधावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच घ्यावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. **हेही वाचा…** पिंपरीमध्ये रुग्णालयात आढावा घेण्यासाठी फडणवीस दाखल, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा कोरोनाच्या प्रादुर्भावावर अजित पवार म्हणाले, जुलै आणि ऑगस्टचा काळ अधिक कठीण आहे. लोकांनी जर त्यांच्यावर घालून दिलेली बंधनं नीट पाळली नाहीत तर त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागू शकते. आपण टेस्टिंग वाढवलं आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. लोकलध्ये मनपा, राज्य सरकार, बॅंकांच्या कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी आहे, पण ही मागणी वाढत आहे. योग्यवेळी याबाबत निर्णय घेण्यात येईल, असंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं. भारतीय जनतेने चीनच्या वस्तू न घेऊन त्यांना धडा शिकवला पाहिजे. जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहतायंत त्यांच्याविषयी आपण कडक भूमिका घेतली पाहिजे, असंही भारत-चीन वादावर अजित पवार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिक्षणाधिकाऱ्यानं केला एकेरी उल्लेख, शिवसैनिक संतापले! 3 दिवसांत संसर्ग बरा होणार रामदेव बाबा यांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण या औषधाच्या वापराने 3 दिवसांच्या आत बरे होतील. पुढच्या 7 दिवसांत कोरोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल. कोरोनिल औषध सकाळी आणि संध्याकाळी एकदा घेतलं जाऊ शकतं. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं. तर गिलोय संक्रमण कमी करण्यास मदतगार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.